Sunday, April 7, 2019

कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा 12 मे पासून


कोल्हापूर,(प्रतिनिधी)-
 कोल्हापूर - तिरूपती आणि कोल्हापूर - हैदराबाद मार्गावर 12 मे पासून इंडिगो एअर लाईन्स कंपनीकडून विमानसेवा सुरू होत आहे.या विमानसेवेची बुकिंग व्यवस्था गुरूवारपासून सुरू झाली. ऑनलाईन बुकिंगसह कोल्हापूर विमानतळावरही बुकिंग सेंटर सुरू केले आहे. उडान योजनेंतर्गत कोल्हापूरातुन तिरूपती आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्यास इंडिगो एअर लाईन्स कंपनीस परवानगी मिळाली आहे.
12 मे पासून याची सुरूवात होणार आहे. तिरूपतीला जाणार्या विमानाचे उड्डाण सकाळी 9.45 वाजता होणार आहे. हे विमान तिरूपतीस 11.40 वाजता पोहोचणार आहे. तिरूपतीहून दुपारी 12 वाजता विमानाचे उड्डाण होईल, तर दुपारी 2.10 वाजता हे विमान कोल्हापूरात पोहोचेल.कोल्हापूर - तिरूपती विमानासाठी प्रती प्रवासी 2999 रूपये तिकीट दर असणार आहे.हैदराबादहून कोल्हापूरला येणार्या विमानाचे उड्डाण सकाळी 8.05 वाजता होणार आहे. सकाळी 9.25 वाजता हे विमान कोल्हापूरात पोहोचेल. हैदराबादला जाणार्या विमानाचे उड्डाण दुपारी अडीच वाजता होणार आहे, तर सायंकाळी सव्वापाचला हे विमान ़हैदराबादला पोहोचेल.तर कोल्हापूर - हैदराबाद विमानासाठी 1999 तिकीट आहे.





No comments:

Post a Comment