Tuesday, April 2, 2019

जत तालुक्यात ऑनलाईन सातबारा उतार्‍याचा फज्जा


जत,(प्रतिनिधी)-
 महसूल खात्याचे ऑनलाईन नोंदी करण्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे ऐन मार्च महिन्यात शेतकर्यांना मोट्या प्रमाणात अडचणी तोंड द्यावे लागले. सातबारा उतार्यावरील नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याने व त्याचे उतारे शेतकर्यांना वेळेत न मिळाल्यामुळे तालुक्यातील 50 टक्के शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याचा प्रकार घडला आहे. तलाठी कार्यालयात शेतजमिनीची खरेदी, पिकाचे वारसाच बक्षीस खरेदीपत्र, हक्क सोडपत्र, विहीर, बोअर नोंदी, पिकांच्या नोंदी, बँक बोजा, - करार, बोजा चढविणे-उतरविणे आदी अनेक कामे प्रलंबित पडली आहेत.
मार्चमध्ये बँकांचे कर्ज भरणे, कर्ज काढणे व जमिनीचे विक्री व्यवहार आदींवर ऑनलाईन सातबारा उतार्याचा परिणाम झाला. त्यामुळे आर्थिक व्यवहार मोट्या प्रमाणात झाला. जोपर्यंत ऑनलाईन उतार्यातील दोष दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे हस्तलिखित उतारे, आठ अ उतार्याचे व्यवहार करण्यास संमती देण्याची गरज आहे. ऑनलाईन उतार्यातील नोंदी करताना महसूल कर्मचार्यांनी चुका केल्या किंवा आणेवारीतील नोंदी करतात, संगणक प्रणाली मध्ये नोंदी व्यवस्थित होत नाहीत व अनेक शेतकर्याची नावे सातबारा उतार्यातून गायब झाली आहेत. त्यामुळे शेतकरी घाबरून गेले आहेत. सातबारा उतार्यातील नावाची नोंदी व्यवस्थित करून द्याव्यात, यासाठी तलाठी कार्यालयात दिवसभर ठिय्या मारून बसत आहे. परंतु सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे नोंदीची प्रक्रिया एकदम मंद गतीने सुरू असते. त्यामुळे दुरुस्त होत नाही, तोपर्यंत नवीन नोंदी होत नाहीत. प्रत्येक तलाठी कार्यालयात संगणक ऑपरेटर नेमून तलाठी ऑनलाईन नोंदी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु संगणक ऑपरेटर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ऑनलाईन उतारा करताना महसूल कर्मचार्यांनी चुका केल्या किंवा सॉफ्टवेअर दोषामुळे नावे गायब झाली आणेवारी नोंदी व्यवहार करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे गेली वर्षभर तलाठी कार्यालयात शेतकरी सात-बारा व आठ अ उतार्यावरील नोंदी व्यवस्थित करून मिळाव्यात, यासाठी हेलपाटे मारत आहेत. ऑनलाईन उतारा देऊन शेतकर्याची सोय करण्यासाठी शासनाने यंत्रणा राबवली. परंतु सोय होण्याऐवजी गैरसोय मोठ्या प्रमाणात झाली. ऑनलाईन सातबारा वरील नोंदी व्यवस्थित न झाल्यामुळे अनेक खरेदी पत्राचे व्यवहार ठप्प झाले, तर खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारामध्ये नोंदी ऑनलाईन करण्यामध्ये सातत्याने अडथळा येत आहे. सामाईक हिश्श्यातील सर्व गटांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने नोंदी होत नाहीत. त्यामुळे ते अहवालामध्ये जाऊन त्याच्या नोंदी रद्द होत आहेत. संगणक प्रणाली ऑनलाईन मध्ये अनेक दोष आहेत. त्याचा फटका दुष्काळी भागातील सर्व शेतकर्यांना बसला आहे. ऑनलाईन उतार्यातील दोष दुरुस्त करण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. 155 आदेशान्वये तहसीलदारांकडून आदेश मिळविण्यासाठी पुन्हा तहसील कार्यालयात हेलपाटे म ारावे लागत आहेत. तालुक्यातील सर्व गावात ऑनलाईन सातबारा उतार्या मध्ये कामकाजामध्ये फज्जा उडाला आह.

No comments:

Post a Comment