Sunday, April 7, 2019

जतमध्ये डॉ चिकोडी यांचे स्पंदन हॉस्पिटलचे उदघाटन

जत,(प्रतिनिधी)-
डॉ प्रशांत चिकोडी यांचे  गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नव्याने सुरू होत असलेल्या स्पंदन हॉस्पिटलचे  मान्यवर डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विट्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर मोहन लकडे यांच्याहस्ते  उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जतचे डॉ मनोहर मोदी होते.प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ सचिन लकडे उपस्थित होते.

 कार्यक्रमास आमदार विलासराव जगताप, डॉ रवींद्र आरळी, डॉ शरद पवार, डॉ मदन बोर्गिकर, डॉ शालिवाहन पट्टणशेट्टी, डॉ श्रीशैल कन्नरे, डॉ भरत हेशी,  ऍड प्रभाकर जाधव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, सुनील पवार, उमेश सावंत,   भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मीनाक्षी अक्की डॉ मलाबादी, डॉ पराग पवार, लखन होनमोरे आदी उपस्थित होते. या हॉस्पिटलमध्ये ह्रदय रोग तपासणी आणि उपचाराबरोबरच मधुमेह, थोयरॉयड ग्रंथी ,मेंदूविकार, फफ्फुसाचे विकार,दमा, पोटाचे विकार,आमलपित्त, आतड्यांचे विकार,संधिवात आमवात, मुतखडा,इत्यादी विकारावर  माफक दरात तपासणी आणि उपचार होणार  असल्याची माहिती डॉ प्रशांत चिकोडी यांनी दिली.
यावेळी डॉ सचिन लकडे म्हणाले की. स्पंदन हॉस्पिटल पेशंटची काळजी घेणारे  जत भागातील हे एक उत्तम रुग्णालय होईल. योग्य मोबदल्यात चांगली सुविधा या रुग्णालयात होईल. या रुग्णालयात दुःखी होऊन येणारे रुग्ण बाहेर जाताना अत्यंत समाधानाने हॉस्पिटलच्या बाहेर जावेत अशा शुभेच्छा दिल्या.  मोठया कष्टाने जिद्दीने वैद्यकीय ज्ञान मिळवण्याचा ध्यास घेतलेले डॉ प्रशांत चिकोडी या भागातील रुग्णांना चांगल्या सुविधा देवून समाजाची सेवा करण्याचे काम करतील असा विश्वास डॉ लकडे यांनी व्यक्त केले .                      यावेळी आमदार विलासराव जगताप म्हणाले की, रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानून कमीत कमी खर्चात आणि जतच्या दुष्काळी जनतेला परवडतील असे उपचार मिळणे आवश्यक आहे. जुजबी उपचार व औषधोपचार करण्यापेक्षा प्रत्येक रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार झाल्यास रुग्ण पूर्ण बरा होण्यास मदत होते. पद पैसा संपत्ती पेक्षा मानसिक समाधान गरजेचे आहे. डॉ रवींद्र आरळी म्हणाले की,मिरज नंतर जत हे दुसरे वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाते.आजकाल जतमध्ये सर्व आरोग्य विषयक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. सर्व चिकित्सक उपलब्ध होत असल्याने आरोग्यक्षेत्रात जतचे नाव जिल्ह्यात नावलौकिक होत आहे.येथील डॉक्टर समाजसेवा करण्यातही कमी नाहीत.
 जतच्या सर्वांगीण विकासामध्ये चिकित्सा क्षेत्र देखील या विकासापासून दूर राहिले नसून या क्षेत्रातील सर्व प्रकारच्या रोगांची व आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची चिकित्सा केंद्रे जतमध्ये सुरु होत आहेत. ही जतकरांसाठी अभिमानाची बाब आहे. डॉ. मोहन लकडे म्हणाले की, "स्पंदन हॉस्पिटलच्या माध्यमातून  जतकरांना अत्याधुनिक सोयी-सुविधांसह प्रगत तंत्राद्वारे हृदयरोग आणि इतर रोगावरील उपचार मिळणार आहे.  या हॉस्पिटलमुळे आज आरोग्याची गुढी उभारली आहे शिवाय जतच्या वैभवात भर पडणार आहे.
डॉ विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले.मोहन माने-पाटील आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे इब्राहिम नदाफ यांनी सूत्रसंचालन तर डॉ प्रशांत चिकोडी प्रा प्रमोद चिकोडी आणि बाबन्ना चिकोडी यांनी स्वागत आणि आभार मानले.

No comments:

Post a Comment