Saturday, April 13, 2019

वाढत्या उन्हाने जत तालुक्यात अघोषित संचारबंदी


जत,(प्रतिनिधी)-
 तालुक्यात सर्वत्रच सध्या उन्हाचा जोरदार तडाखा जाणवत असून, गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या उन्हाचा पारा 38 अंशाच्या वर गेल्याने वैशाख वणवा जाणवू लागला आहे. दुपारी उन्हाची तीव्रता प्रचंड जाणवत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमालीची रोडावली आहे. त्याच बरोबर आठवडे बाजारातही शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणार्या ग्राहकांची संख्याही रोडावली आहे.
दुपारी घराबाहेर पडताना ग्रामस्थ टोपी, गॉगल त्याचबरोबर सुती कपड्यांचा वापर करीत आहेत.
 तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातून येणार्या ग्रामस्थांची संख्या कमी झाल्याने तहसील कार्यालय, पंचायत समि ती, कृषी कार्यालय यासारख्या शासकीय कार्यालयातील वर्दळही कमी झाली आहे. उष्णतेपासून सुटका मिळविण्यासाठी नागरिक शीतपेय विक्रेते गर्दी करू लागले आहेत. घरोघरी वातानुकूलन यंत्राची घरघर ऐकू येत असून बळीराजाही आपली शेतातील कामे सकाळी लवकर किंवा दुपारी 4 नंतर करण्यावर ही देऊ लागला आहे. सध्या ही स्थिती अद्याप दीड महिना असेल. उन्हाळ्याचे दिवस कसे जाणार, या मनःस्थितीत लोक असून दुपारी उन्हाचा कडाका असल्याने शहरातील व गावातील रस्ते ओस पडत आहेत. ठिकठिकाणी थंड पेयांच्या गाड्यांवर गर्दी वाढली आहे. वाढत्या उन्हाने मानवी आरोग्यावर व जनावरांच्या विविध आजारांत वाढ झाली आहे.

No comments:

Post a Comment