जत,(प्रतिनिधी)-
वायफळ
(ता. जत) येथून जवळच असलेल्या
मकबूल मोहला शेख यांच्या विहिरीचे काम सुरू होते. प्रशांत आबासाहेब
यादव (वय 36. रा. वायफळ ता. जत) हे काम करण्यासाठी
दररोज जात होते. दुपारी ते विहिरीवर थांबले असता अचानक त्यांचा
तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अधिक
माहिती अशी की, वायफळ येथे गेल्या अनेक दिवसांपासून मकबूल मोहला
शेख यांनी विहिरीचे काम सुरू केले होते. कामासाठी काही मजूर दररोज
काम करत होते. यात प्रशांत यादव हे कामासाठी येत होते.
काम सुरू असताना ते विहिरीवर ते थांबले असताना अचानक त्यांचा तोल जाऊन
विहिरीत पडून मृत झाला.
No comments:
Post a Comment