जत,(प्रतिनिधी)-
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या जत तालुका शाखेच्या अध्यक्षपदी डॉ.रोहन मनोहर मोदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दोन दिवसांपुर्वी असोसिएशनची बैठक पार पडली. यात नव्या, उत्साही व संघटना बांधणी करणाऱ्या डॉक्टरची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.त्यानुसार डॉ.रोहन मोदी हे चांगले काम सांभाळू शकतात. त्यामुळे त्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच आणखी एक तरुण डॉक्टर शरद पवार यांनीही डॉ. रोहन मोदी यांच्यासमवेत काम करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.
बैठकीस जत येथील ज्येष्ठ सर्जन डॉक्टर डॉ.मनोहर मोदी, डॉ.देवानंद वाघ, डॉ. विजय पाटील, डॉ. मल्लिकार्जुन काळगी, डॉ. शुभांगी गुरव, डॉ. सौ.सोनाली काळगी, डॉ. सौ.विद्या नाईक, डॉ. एस.ए. व्हनखंडे(संख), डॉ. शेखर हिट्टी (माडग्याळ), डोळ्यांचे तज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन,डॉ. सौरभ पटवर्धन, डॉ.माधवी पटवर्धन,डॉ. कन्नुरे व डॉ. तुळजान्नावर आदी डॉक्टर उपस्थित होते.
डॉ. रोहन मोदी यांचा स्वतःचा जत येथील महाराणा प्रताप चौकात मोदी सर्जिकल व मँँटर्णिटी हॉस्पिटल असे स्त्री रोगावरील रुग्णालय आहे. गेल्या तीन- चार वर्षापासून हे रुग्णालय सुरू आहे. डॉ. मोदी यांनी एम.बी.बी.एस. ही पदवी विजापूर येथे केली. त्यानंतर पदव्युत्तर डी.जी.ओ. शिक्षण मिरज येथे केले आहे. तर लप्रोस्कोपी व अनुभवासाठी मुंबई व बेंगलोर येथे काम केले आहे.
निवडीनंतर डॉ. रोहन मोदी म्हणाले की, गेल्या ९० वर्षापासून आय.एम.ए. ही संघटना काम करीत आहे. या संघटनेच्या बळकटीसाठी आपण चांगले प्रामाणिक कार्य करणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून गरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबीर राबविणार असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment