Wednesday, April 17, 2019

सांगली जिल्ह्यातील काँग्रेस संपली:मुख्यमंत्री फडणवीस

जत,(प्रतिनिधी)-
  शंभर वर्षाच्या इतिहासात  काँग्रेसची सांगली जिल्ह्यात कुठेही शाखा नाही, अशी अवस्था झाली असून ज्यांना डाकू, लुटेरे म्हटले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात कसला आला स्वाभिमान? अशी खरमरीत टीका  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत तालुक्यातील संख येथील प्रचार सभेत बोलताना केली.  जत तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारी म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

सांगली लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संख ता जत येथे आज दुपारी आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार संजय पाटील, पृथ्वीराज देशमुख, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, सुनील पवार, तमनगौडा पाटील, रवींद्र आरळी, श्रीपाद अष्टेकर, शिवाजीराव ताड, अजित पाटील, संजय कांबळे, आर. के. पाटील, सरदार पाटील, कविता खोत, रेखा बागेळी, मनोज जगताप, स्वामी अमृतानंद ,दिनकर पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्ह्याच नाव राज्यात,देशात  पोहचविण्याचे काम वसंतदादांनी केले. त्याच्या कामाची पद्धत अनोखी होती. पण हीच त्यांनाच विसरून गेली. त्याच्या जन्मशताब्दी निमित्त कॉग्रेसने एकही कार्यक्रम केला नाही. त्यांच्या वारसांनी देखील काही केले नाही. मात्र वसंतदादा यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम आम्ही केला.
वसंतदादांच्या वारसांनी सोईची भूमिका घेतली आहे.  हे नाटक करत आहेत हे जनतेला समजत आहे. म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यातील पश्चिम भाग ओलिताखाली आला आहे. आता पूर्व भाग लवकर ओलिताखाली येईल. येत्या काही दिवसांत जत तालुका सुजलाम सुफलाम झाल्या शिवाय राहणार नाही.
जिल्ह्याने आम्हाला भरभरून दिले आहे. असाच आशीर्वाद आम्हाला हवा आहे. ही गल्लीची निवडणूक नाही देशाची निवडणूक आहे.
ते पुढे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षात आघाडीच्या सरकारने सिंचनासाठी एका रुपयाचा निधी दिला नाही.त्यामुळे टेंभू, ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजना अपूर्ण राहिल्या.  मुख्यमंत्री विदर्भातला आहे, त्यामुळे या योजना पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी असल्याची टीका विरोधक करत होते. या योजना पूर्ण करण्यासाठी बळीराजा सिंचन योजना आणि प्रधान मंत्री सूक्ष्म योजना अंतर्गत पूर्ण केल्या. त्यामुळे योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत. आघाडी सरकारने प्रस्थापिताना विस्थापित केले. आमचे सरकार आल्यानंतर विस्थापिताना प्रस्तापित केले. अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले.
  जत तालुका जत तालुक्यातील मतदारांनी गेल्या निवडणुकीत संजय पाटील यांना जिल्ह्यातून मताधिक्य दिलं होतं.यावेळीसुद्धा संजय पाटील यांना गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल, अशी आशा आहे.

No comments:

Post a Comment