Saturday, April 27, 2019

मानवता धर्म स्थापन करण्यासाठी सद्गुरु अवतार घेतात- आदिनाथ नेमाने

जत,(प्रतिनिधी)-
जगामध्ये धर्माच्या नावाखाली अनेक हिंसक घटना घडत आहेत,मानव धर्माच्या पाठीमागे लागुन आपले सुख गमावुन बसला आहे मानव वैर, निंदा, घृणा , ईर्शा, नफरत,या गोष्टीमध्ये अडकुन पडलेल्यामुळे त्याला जिवनामध्ये सुख,समाधान,शांती प्राप्त होत नाही या सर्व गोष्टींतुन बाहेर काढण्यासाठी प्रत्येक युगायुगाला जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणुन मानवता धर्म स्थापन करण्यासाठी सद्गुरु अवतार घेतात असे प्रतिपादन एस.आर.व्ही.एम्.हायस्कुल जत येथे आयोजित मानव एकता दिवसानिमित्त  सत्संग कार्यक्रमामध्ये आदिनाथ नेमाने (प्रचारक मुंबई) यांनी केले

     कार्यक्रमास तालुक्यातुन मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. तत्पुर्वी कार्यक्रमास मुंबई येथुन आलेले नारायण सोळंके, नामदेव चव्हाण,मोनु गुप्ता यांनी विचार,भक्तीगीत,अभंग याव्दारे आपले विचार मांडले.सेवादल युनिट नंबर ११६१ च्या सेवादल भगीनी यांनी मानव एकता दिवसानिमीत्त  भक्तीरचना सादर करुन सांगितला गेला.
    श्री पणे पुढे म्हणाले की तत्कालीन सद्गुरु बाबा गुरुबचन सिंह जी महाराज यांनी समाजाला जी शिकवण दिली तिच शिकवण आज समयाला सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या रुपामध्ये जिवंत आहे.२४ एप्रिल १९८० रोजी सदगुरु बाबा गुरुबचनसिंहजीनी त्यावेळी आपल्या दोन्ही गुरुशिष्यांना वचन दिले.एकाला स्वत:वर गोळ्या घालायला व एकाला गुरुच्या आगोदर  बलिदान देण्यासाठी ज्यावेळी कार्यक्रम समाप्तीनंतर बाबाजीनी लगेचच प्रसादी भोजन न करताच आपल्या कुटीवर कोण तरी वाट पाहत आहे म्हणुन गुरुभक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटीवर गेले व गुरुभक्ताकडुन स्वतावर गोळ्या झाडुन घेतल्या त्या अगोदर दुसऱ्या शिष्याला वचन दिलेप्रमाणे चाचा प्रतापसिंहजीनी आपल्या सद्गुरुच्या वरती गोळ्या झाडत असल्याचे पाहुन सद्गुरु च्या पुढे जाऊन सदगुरुच्यावरती येणाऱ्या बंदुकीच्या गोळ्या आपल्या अंगावर झेलून आपल्या देहाचे बलिदान दिले व सद्गुरुनीही दोन्ही गुरुशिष्यांना दिलेले वचन पूर्ण केले व आपला देह ठेवला व मानवतेची शिकवण दिली त्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे सांगितले.त्यांनी मंडळाचा पवित्र असा महान ग्रंथ हरदेव वानी पद क्रमांक १५७ चा आधार घेऊन गुरु पिर पैगंबरांचा अवतार समाजामध्ये मानवता निर्माण करण्यासाठीच झालेला असतो आपण फक्त त्यांच्या शिकवणीचा आधार घेऊन जिवन जगल्यास मनुष्य जन्माचे सार्थक होईल असे सांगितले.
         सद्गुरु ने तुम्हा आम्हाला जात,पात,भेदभावातुन मुक्त करुण प्रेमाची शिकवन दिलेली आहे प्रेमाशिवाय भक्ती नाही प्रेम करायचे असेल तर निरंकाराशी करा एकदा निरंकार सगळ्यामध्ये दिसायला लागला तर जिवनामध्ये आनंद निर्माण होईल‌.आदि भावना व्यक्त केल्या.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाशजी माने यांनी केले.कार्यक्रमास एस.आर.व्ही.एम्.हायस्कुलचे  प्राचार्य व सर्व स्टाफ चे मोलाचे सहकार्य लाभले.
    नियोजन जत शाखेचे मुखी जोतिबाजी गोरे,व सेवादल संचालक संभाजी साळे यांनी केले ‌

No comments:

Post a Comment