Thursday, April 4, 2019

जत पंचायत समितीच्या कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या


जत,(प्रतिनिधी)-
 जत पंचायत समितीमध्ये समाजकल्याण विभागात लेखनिक म्हणून काम करणारे दीपक सोनाजी बर्गे (वय 38) याने गुरुवारी सकाळी जत ते सांगली रस्त्यावर असलेल्या पंचायत समि ती कर्मचारी निवासस्थानामध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत पंचायत समिती जतचे शिपाई प्रमोद जयकुमार सोहनी यांनी जत पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जत पंचायत समितीमध्ये समाजकल्याण विभागात लेखनिक म्हणून गेल्या वर्षभरापासून दीपक सोनाजी बर्गे हे काम करत होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी ते बाहेर होते. दरम्यान, पंचायत समितीच्या काही कामानिमित्त वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांना दूरध्वनी करून बोलून घेण्याचा प्रयत्न केला. दूरध्वनी उचलला नाहीत. त्यामुळे घरी आहेत का, याबाबत चौकशी करण्यासाठी पंचायत समिती कमचारी पाठवलअसता ते आत्महत्या करून घेतल्याचे निदर्शनास आले. यावेळी तातडीने पोलिसांनी कर्मचारी निवासस्थानामध्ये येऊन मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. दीपक सोनाजी बर्गे है आटपाडी पंचायत समितीमध्ये लेखनिक म्हणून काम करत होते यापूर्वी त्यांची जात पंचायत समितीमधील लेखनिक म्हणून बदली झाली होती. पंचायत समितीमध्ये समाजकल्याण विभागात लेखनिक म्हणून काम करत होते. त्यांनी कशामुळे आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही.

No comments:

Post a Comment