जत,(प्रतिनिधी)-
सगळे गट-तट विसरून एकत्र येत जत तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा
सोडविण्यासाठी विशाल पाटील यांना भरघोस मतांनी मताधिक्य देऊ, असा निर्धार तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे यांनी केला. लोकसभेचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या उमराणी
येथील सभेत ते बोलत होते. यावेळी विशाल पाटील, विक्रम सावंत, गंगाधर बजंत्री, पिरगोंडा हुल्याळकर, अशोक पाटील यांच्यासह कार्यकर्ते
व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश शिंदे म्हणाले, वसंतदादांनी म्हैसाळ योजनेला जन्म दिला. कवठेमहांकाळ
व जत तालुक्याला पाणी द्यायचं दादांचं स्वप्न होतं. ते पूर्ण
करण्यासाठी त्यांचे नातू विशाल पाटील आले आहेत. विशाल पाटील यांना
निवडून देण्यासाठी आपण सगळे गट-तट बासनात गुंडाळून ठेवू आणि एकीने
लढूया. सध्या 1972 च्या दुष्काळापेक्षा
वाईट परिस्थिती आहे. पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांचे हाल सुरू आहेत. पण कोणत्याही सुविधा सरकार
पुरवत नाही. 1991 च्या जनगणनेनुसार टँकरच्या खेपा केल्या जात
आहेत. प्रतीक पाटील यांनी म्हैसाळ योजनेसाठी 978 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. भाजपच्या खासदाराने केवळ
74 कोटी रुपये देऊन मोठ्या जाहिराती केल्या. पण
प्रतीक पाटील म्हणायचे, सगळं शिवार पाण्याने भिजल्याशिवाय नारळ
फोडायचा नाही. अशा चांगल्या माणसांच्या पाठीशी आपण राहायचं आहे.
सुरेश शिंदे यांनी खासदार व जतचे आमदार यांच्यावर सडकून टीका केली.
पंचायत समितीत जवाहर विहीर योजनेत भ्रष्टाचार केला आहे. थापा मारून लोकांना भूलविण्याचं काम ते करीत आहेत, अशा
थापाड्या लोकांना हाकलून लावले जाईल.
No comments:
Post a Comment