Friday, September 20, 2019

जिल्ह्याची वाटचाल 'धुरमुक्त-गॅसयुक्त' च्या दिशेने

जत,(प्रतिनिधी)-
'धुरमुक्त-गॅसमुक्त' महाराष्ट्र संकल्पना राज्य सरकारने राबवली. त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. 100 रुपयांत गॅस कनेक्शन साठी 5 हजार 318 कुटुंबांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात यापूर्वीच 6 लाख 47 हजार 646 गॅस जोडण्या कार्यरत आहेत. नव्यांना नोंदणीसह 6 लाख 52 हजार 964 कुटुंबांकडे गॅस जोडण्या होतील. दोन सिलिंडर गॅस असलेले ग्राहक विभक्त कुटुंबात एक एक गॅस सिलिंडर वापरत  असल्याचे चित्र आहे.

घरटी सिलेंडर झाल्याने जिल्ह्याची वाटचाल धुरयुक्तकडे सुरू आहे. कागदोपत्री अद्यापही 60 हजार कुटुंबांकडे गॅस कनेक्शन चे उद्दिष्ट ठेवावे लागणार आहे. केवळ 264 किलो लिटर रॉकेलचा पुरवठा करण्यात येत आहे. गॅस सिलिंडर दहा वर्षांपूर्वी उच्चभ्रु लोकांची सोय म्हणून पाहिले जात होते. गेल्या चार-पाच वर्षात मात्र ती गरज म्हणून पाहिले जाऊ लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वृक्षांची तोड थांबवण्यासाठी घरटी गॅस जोडण्याचा संकल्प सोडला. यातून पर्यावरण जपण्याचाही एक चांगला उद्देश सरकारचा होता. त्यातून ही अनेक कुटुंबांनी गॅस जोडण्या घेतल्या नाहीत. म्हणून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना देशभर राबवण्यात आली. त्याअंतर्गत देशातील सुमारे20 टक्के कुटुंबांना गॅस जोडण्या मिळाल्या. त्यासाठी केवळ जोडणी घेताना केवळ 100 रुपये रोखीने तर अनामत रक्कम गॅस प्रत्येक भरणीवेळी शंभर रुपायाप्रमाणे रक्कम घेतली जात होती. जिल्ह्यात उज्ज्वला योजनेतून 1 लाख 3हजार 781 एवढे ग्राहक संख्या वाढली.
अभियान राबवल्यानंतर प्रत्येक कुटुंबांकडे गॅस नसल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या लक्षात आले. 28 जून रोजी राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे राज्यात 15 जुलै ते 14 ऑगस्ट कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान राबवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. अभियानात धूरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी 100 टक्के सर्व  कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शनसाठी प्रस्ताव मागवण्याचे ठरले.  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी गॅस जोडण्याचे आदेश देण्यात आले होते. या कालावधीत 5 हजार 318 कुटुंबांनी गॅस ची मागणी केली.
एक दृष्टिक्षेप...
एचपी,बीपी, आयओसी च्या 78 गॅस एजन्सी जिल्ह्यात आहेत. सांगली जिल्ह्याची लोकसंख्या 29 लाखांवर असून एकूण गॅस जोडण्या 6 लाख 47 हजार 646 आहेत.

No comments:

Post a Comment