जत पूर्व भागातील ६४ गावांनी घेतलेल्या विधानसभा निवडणूक बहिष्काराच्या निर्णयास आपला पाठिंबा असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य सी. आर. सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जत पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न न सोडवला गेल्याने ६४ गावांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शासनाने आश्वासन देऊनही ते पाळले नाही. त्यामुळे या गावांमधील लोकांमध्ये संतापाची भावना आहे. पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटावा,यासाठी ह. भ. प. तुकारामबाबा महाराज यांच्या पुढाकाराने येत्या निवडणुकीवर बहिष्कार घालायचे ठरवले आहे तसेच कोणीही विधानसभेची निवडणूक लढवू नये,
अशी भूमिका घेण्यात आल्याने या निर्णयास आपला पाठिंबा आहे, असे श्री सांगलीकर यांनी सांगलीकर म्हणाले.
पुढे बोलताना सी. आर. सांगलीकर म्हणाले की, जत तालुक्यातील ६४ गावांचा पाण्याचा प्रश्न निवडणुकीवर बहिष्कार टाकून अथवा जत तालुक्यातील कोणीही निवडणूक न लढवून जर पाण्याचा प्रश्न सुटणार असेल तर जनतेसोबत ठामपणे उभा राहणार आहे आणि येथील जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयास ठाम राहून माझी विधानसभेची भूमिका राहणार आहे. जत तालुक्यातील जनतेच्या पाणी योजनेसाठी संघर्ष करावयास तयार रहावे असे आवाहन केले.
No comments:
Post a Comment