Wednesday, September 4, 2019

धर्म आणि आध्यात्म यांचा अर्थ समजावुन घेणे महत्त्वाचे- किशोर पवार

जत,(प्रतिनिधी)-
आजचा मानव आध्यात्म आणी धर्मच्या नावाखाली वेगळा अर्थ काढुन आपले जिवन व्यर्थ घालवत आहे आहे पण खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे मनुष्याने आपल्या कर्तव्याचे पालन करणे होय आणी आपण आपले मुळ स्वरुप कोणते आहे याची ओळख होणे म्हणजे आध्यात्म होय असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळाचे युवा प्रचारक किशोरजी पवार सांगली यांनी एस.आर.व्ही.एम.हायस्कुल जत येथे आयोजित सत्संग सोहळ्यामध्ये आध्यात्म आणी धर्म या विषयावर बोलताना केले.

    ते पुढे म्हणाले की, ईश्र्वराची ओळख करण्यासाठी मनुष्याचा जन्म मिळाला आहे आपण ज्या स्वरुपातुन आलो आहे त्या स्वरुपाची ओळख करून घेणे म्हणजे आध्यत्म होय स्वरुपाची ओळख सदगुरु जिवनामध्ये आल्यावर होते आपले निजस्वरुप दाखविण्याचे कार्य सदगुरु करतात.संत निरंकारी मंडळ हे धर्म, ग्रंथ, शास्त्रानुसार निजस्वरुपाची ओळख करून देऊन एका प्रभु परमात्म्याचे दर्शन करुन देत आहे अध्यात्म आणि धर्म यांचा अर्थ समजावुन घेऊन आपले जिवन सार्थक करा असे आवाहन पवार यांनी केले यावेळी एस. आर. व्ही.एम.हायस्कुल परीसराची स्वच्छता मंडळामार्फत करण्यात आली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळुंखे यांनी केले नियोजन जत शाखेचे जोतिबा गोरे, संभाजी साळे,संज्योति साळुंखे यांच्यासह सर्व सेवादार भक्त यांनी केले.

No comments:

Post a Comment