जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात सुमारे दहा हजार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संख्या आहे. या शिक्षकांना सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 10 लाख रुपयांचे कॅश क्रेडिट देण्याची मागणी शिक्षक नेते मच्छिंद्र ऐनापुरे यांनी केली आहे. यामुळे शिक्षकांना अर्थसहाय्य तर होणार आहेत,पण बँकेलाही याचा फायदाच होणार आहे.
राज्यातल्या शिक्षक आणि इतर सरकारी कर्मचाऱयांना सातवा वेतन लागू झाला आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने कॅश क्रेडिट रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक शिक्षकांना सध्या 10 लाखांचे कॅश क्रेडिट देते.
जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी यांना या कर्जाचा लाभ होणार आहे. कॅश क्रेडिट कर्जामध्ये मुद्दल न घेता व्याज घेतले जात असल्याने शिक्षकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
जिल्हा बँकेने शिक्षकांसाठी विविध कर्ज योजना राबविल्यास आणि कॅश क्रेडिट कर्ज योजना राबविल्यास बँकेलाही चांगलाच लाभ होणार आहे. शिक्षक व इतर सरकारी कर्मचारी कमी व्याज दराने व सुलभ पद्धतीने कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षक हे सरकारी कर्मचारी असल्याने कर्जाची शंभर टक्के वसुली होत असल्याने एनपीए थकीत राहण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे बॅँक डबघाईला येण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे शिक्षकांच्या कॅश क्रेडिट कर्ज रकमेत वाढ करून ती 10 लाखांपर्यंत करण्याची मागणी आहे. सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँक फक्त 1 लाखापर्यंत कॅश क्रेडिट देते. ही रक्कम फारच तोकडी असून शिक्षकांचे काहीच याच्याने होत नाही. पुणे जिल्हा सहकारी बँक तिथल्या शिक्षकांना पूर्वी 3 लाख कॅश क्रेडिट रक्कम देत होती. अलीकडेच ही रक्कम वाढवून 10 लाख केली आहे. अशाच प्रकारे सांगली जिल्हा बँकेने कॅश क्रेडिट रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमधून होत आहे.
शिक्षकांची हक्काची स्वत: ची शिक्षक बँक/पतसंस्था असताना दुस-या पुढे हात का पसरता...
ReplyDelete