Thursday, September 5, 2019

दळणाचे जाते झाले दिसेनासे


जत,(प्रतिनिधी)-
काळाच्या ओघात जात्यावर दळण दळण्याची परंपरा कालबाहय झाली आहे. आता पीठ गिरण्यांमुळे जाते दिसेनासे झाले आहे. आधी गहू, ज्वारी दळणासाठीच नव्हे तर डाळ दळण्यासाठीही जात्याचा वापर होत होता.
खेड्यापाड्यात कुटुंबासाठी उपयुक्त असलेले जाते व पाटे  वरवंटें  आजही घरातल्या अडगळीचा ठिकाणी ठेवलेले दिसून येतात. यांत्रिकीकरणाच्या युगात दळण दळण्यासाठी मशीन निर्माण झाल्या आहेत. याशिवाय मिक्सर ग्राईंडर घराघरात दिसून येतात. ज्यावेळी या मशीन नव्हत्या तेव्हा जात्याच्या माध्यमातून महिला पहाटे उठून दळण दळायच्या त्यापासून पोळी, भाकरी बनवायच्या. जात्याचे महत्व बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून प्रगटपणे जाणवते.

बहिणाबाई अशिक्षित परंतु, प्रतिभासंपन्न कवयित्री. या जात्यावरच अनेक ओव्या, गाणी त्यांना सूचत होत्या. जात्यातून भराभर येणार्या दळणासोबत ओठावर ओव्या यायच्या. खानदेशी भाषेत जात्याला घटोरा हा शब्द वापरला जातो. ’कसा घरोटा, माझा वाजे घरघर. घरघरीतून त्याच्या माले ऐकू येतो.’ सूर दळता दळता बहिणाबाई ओव्या गाऊ लागायच्या.
जात्याची लयबद्ध घरघर ऐकता ऐकता मनुष्य अंर्तमुख व्हायचा. स्वत:शी जात्याशी जीवनातल्या अनुभूतीशी आणि हे सारे निर्माण करणार्या देवाशी केव्हा हितगुज करायच्या बहिणाबाईंना कळत नसे.
याबद्दल बहिणाबाई म्हणतातमाझे घराटे घराटे, दोन कान दोन व्होट, दाने खाये मूठ मूठ. त्याचेतून गये पीठ’. जात्यातून जसे पीठ बाहेर येते. तसे माझ्या पीठातून गाणे ओठावर येते. जात्याच्या घरघरीतून निर्माण घेणार्या सुरातून बहिणाबाईचे गाणे जन्माला येत होते.
बहिणाबाई म्हणतात, नाते जसे एकदा जुळले की तोडता येत नाही. तसे या जात्यातून पीठ येते म्हणून त्याला जाते म्हणू नये. शेतकरी कुटुंबासाठी जाते मोठे आधार होते. परंतु आता आधुनिकीकरणात जाते मागी पडले आहे. त्याला घरातल्या अडगळची जागा मिळाली आहे.

No comments:

Post a Comment