जत,(प्रतिनिधी)-
कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणाबरोबरच
अपघातांच्या प्रमाणातही वाढ होत असून ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या मानसिक स्थितीवरही
त्याचा परिणाम होत आहे.
बेदरकार दुचाकी चालविणार्या स्टंटबाज युवकांमुळे
त्यात आणखी भर पडत असल्याने हुल्लडबाज तरुणाईला आवर घालणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
रस्त्यावरुन एकाग्रपणे वाहन
चालविताना अचानक प्रेशर हॉर्न वाजण्यामुळे बिचकल्यासारखे होते. आपले काही
चुकले नाही ना यासाठी पुढचा वाहनचालक दुचाकी वेगात असतानाही मागेपुढे पाहतो. या काळात
लक्ष विचलित झाल्यामुळे रस्त्यांच्या परिस्थितीकडे, दुचाकीच्या वेगाकडे दुर्लक्ष
होते. तोल जाण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे
अनेक अपघात होत असल्याचे चित्र आहे.
हुल्लडबाजी आणि आपल्याकडे
लक्ष जावे यासाठीच युवकांकडून होणार्या हॉर्नच्या कर्णकर्कशतेमुळे मानसिक
स्थितीवरही परिणाम होत असतो. कर्णकर्कश हॉर्नमुळे होणार्या दुष्परिणामांची जाणीव असल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी मागे ‘नो हॉर्न’ प्रबोधन
मोहीम राबविली. शाळा, महाविद्यालयांतून
तसेच चालक परवाना देताना या बाबतचे प्रबोधन करण्यात आले होते. पण पुढे येरे माझ्या मागल्या,
अशीच गत झाली. आता ही मोहिम परत राबवण्याची गरज
आहे.
तरुणाईच्या हुल्लडबाजीतून
होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी वाहतूक शाखेने कारवाईची भूमिका घेण्याची मागणी जोर धरू
लागली आहे.
No comments:
Post a Comment