उमदी,(गणेश बागडे यांजकडून)-
जत पूर्व भागातील वंचित ६४ गावातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष केल्याशिवाय पाणी येणार नाही. त्यासाठी संघर्ष करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. त्याकरीता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढाची गरज आहे. तरच आपणाला भविष्यामध्ये पाणी येणार आहे.ही लढाई आर या पारची करावी लागणार आहे. म्हैसाळ विस्तारीत.योजनेबाबत तत्वता मान्यता देण्याची घोषणा केली होती.जुलै महिन्यात पाणी खळखळणार असा शब्द दिला होता. ही योजनेची घोषणा फसवी आहे असा आरोप गोंधळेवाडी (ता जत) चिकलगी (ता मंगळवेढा) येथील तपोवन भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराजांनी केला आहे .
पूर्व भागातील वंचित ६४गावातील शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा व म्हैसाळ योजनेबाबत व पुढील आंदोलनाची दिशा याकरीता गावाला त्या मेळाव्यात ते बोलत होते.मेळावाची सुरुवात गोंधळेवाडी ते मंत्रालय या पायी दिंडीत समाविष्ट असलेले समाविष्ट झालेले सानवी शिंदे, शिवम भिसे या बालकांचा हस्ते श्रीसंत बागडे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली.
प्रास्ताविक व मेळावा उद्देशबद्दलची माहिती मल्लू पुजारी यांनी दिली.
तुकाराम महाराज पुढे म्हणाले की, गोंधळेवाडी ते मुंबई मंत्रालय काढण्यात आलेल्या पायी दिंडीला शासनाने दिलेल्या पत्राचा खुलासा व पत्रातील पोल-खोल करण्यात आला. म्हैसाळ योजनेतील कृष्णा पाणी तंटा लवाद म्हैसाळ योजनेतील अंतर्भूत गावासाठी १७.४४ टीएमसी एवढे मान्यता दिली असून या पाण्याचे नियोजन निश्चित करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रस्तावित ६४ गावाच्या सिंचन क्षेत्रासाठी योजनेमध्ये पाणी शिल्लक नाही. या ठिकाणी पाणी देण्याचे असल्यास त्याकरता अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी आवश्यक आहे. ही बाब धोरणात्मक त्याकरीता स्तरावर मंजुरीची आवश्यकता आहे असे पत्र दिलेले असताना सुद्धा गेली ३५ वर्षापासून राजकारणी मंडळी निवडणुका आले की पाणी देण्याचे गाजर दाखवतात. मुळात या योजनेतील पाणी शिल्लक नसताना गावाला पाणी कुठून देणार ? असा सवाल त्यांनी व्यक्त केला .या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा काय घ्यावे ग्रामस्थांनी ठरवावा.मी तुमच्या बरोबर खांद्याला लावून काम करण्यास तयार आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या वंचित ६४ गावातील ग्रामस्थांनी घ्यावं असे आवाहन त्यांनी केले
शासनाने जर आम्हाला लोकसहभागातून काम करण्यास परवानगी दिल्यास मायथळ कॅनालपासून व्हस्पेठ गुड्डापुर तलावात पाणी सोडण्यासाठी काम करू. हे काम पूर्ण झाल्यास येथून हे पाणी संख मध्यम प्रकल्पात जाईल त्याचा फायदा करजगी, बालगाव, हळ्ळी येथे सहजपणे सायफन पद्धतीने जाऊ शकते. ३० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. लोकसहभागातून काम करायला परवानगी देत नाही असा आरोप त्यांनी केला.
ग्रामस्थाकडून सत्कार : गोंधळेवाडी ते मुंबई मंत्रालय पायी दिंडीत सहभागी झालेल्या शेतक-यांचा गुड्डापूर ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. उमेदवारी न दाखल करण्याचा निर्णय : काँग्रेसमधून इच्छुक असलेले उद्योगपती सी आर सांगलीकर याने मी पूर्व भागातील वंचित ६४ गावातील शेतकऱ्यांच्या बरोबर आहे .मी निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरणार नाही. तुमच्यासोबत आहे. जर तुकाराम बाबा ने लोकसहभागातून काम करायला सुरुवात केली तर मी २० लाखाचा निधी देणार असल्याचे सांगितले. यावेळी ६४गावातील वंचित शेतकरी काही गावातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी सदस्य उपस्थित होते.
मतदानावर बहिष्कार :
मेळाव्यामध्ये वंचित ६४ गावातील शेतकऱ्याने जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विधानसभा सह येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही असा निर्धार हात उंचावून केला.
शासनाचा संताप :-
गेली ३५ वर्षांपासून पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. निवडणूकीत फक्त पाण्याच्या आश्वासन दिले जाते.त्याबद्दल शासनाचा संताप व्यक्त केला.
यावेळी प्रा पांडुरंग वाघमोडे सुनील वाली (सोरडी) व्यंकटेश कुलकर्णी (संख) शेतकरी संघटनेचे राजेंद्र पुजारी (खंडनाळ) इरय्या स्वामी ,दरीबडची उपसरपंच तात्या चव्हाण आर पी आयचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हुवाळे पंचायत समिती सदस्य भैरु माळी, दरीबडची ग्रामपंचायत सदस्य अमोगसिध्द शेंडगे चंद्रशेखर रेबगोंड (संख)यांनी पाणी मिळाशिवाय मतदान करायचे नाही.असे मनोगतात व्यक्त केले.
घोषणा फलक:
आमच ठरलय, जोपर्यंत आमच्या गावात पाणी येत नाही, तोपर्यंत मतदान नाही.पाणी नाहीतर मतदान नाही. घोषणा फलक घेऊन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment