जत,( प्रतिनिधी)
दोन दिवसापुर्वी आपण मातोश्रीवर नेते उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मुलाखत दिली असल्याची माहिती माजी बनाळीचे माजी जि.प. सभापती संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी सभापती संजीवकुमार सावंत यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढविणार असून पक्षाकडे उमेदवारीची मागितली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजीवकुमार सावंत शिवसेनेकडून विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे.त्यांनी शिवसेनेच्या नुकत्याच सेनाभवनात झालेल्या इच्छुक मुलाखतीत जत मधून उमेदवारी मागितली आहे.
दुष्काळी जत तालुक्यातील पाणीदार नेतृत्व म्हणून सावंत यांच्याकडे पाहिले जाते.म्हैसाळ योजनेतून पाणी आणण्यासाठी अनवाणी पायाने बनाळी ते जत अशी तेरा किलोमीटर पदयात्रा व बैलगाडी मोर्चा काढून,उपोषण करून त्यांनी मोठा संघर्ष केला होता. जिल्हा परिषदेतील पाच वर्षाचा त्यांचा कार्यकाल उल्लेखनीय कामगिरी केलेला आहे.मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी विलासराव जगताप यांच्याशी एकनिष्ठ राहून भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिक पणे केले होते. परंतु इतर कोणत्याही पक्षात त्यांचे मन रमले नाही.जेष्ठ नेते शिवाजीराव ताड यांच्या तालमीत तयार झालेल्या सावंत यांनी अखेर सेनेचा बाण हाती घेतला आहे. 11 सप्टेंबर रोजी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत परिवहनमंत्री दिवाकर रावते, क्रुष्णा खोरे महामंडळाचे सदस्य नितीन बाणूगडे, सांगली जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, संजय विभूते, जतचे अमित दुधाळ, विजयराजे चव्हाण, शिवाजी पडोळकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment