Wednesday, September 4, 2019

युवकांच्या आग्रहाखातर विधानसभा निवडणुक लढविणार: विक्रम ढोणे

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका विस्ताराने मोठा व कायम दुष्काळी तालुका असुनही या तालुक्यातील प्रस्थापित नेते मंडळीच्या राजकीय इच्छाशक्तीअभावी तालुका विकासापासुन दूर आहे .या तालुक्यातील नेते मंडळीनी जिल्ह्यातील नेत्यांचे  मांडलिकत्व स्विकारले असल्याने   प्रस्थापित नेते या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात आपल्या तालुक्यासाठी संघर्ष करू शकत नाहीत .याचाच गैरफायदा जिल्ह्यातील  नेते मंडळीनी घेतल्याने  ऊस तोड कामगार पुरवणारा तालुका म्हणूनच आपल्या तालुक्याकडे पाहिले जाते .ही ओळख पुसण्यासाठी तालुक्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी  विधानसभा   लढावयाची  आहे ,असे प्रतिपादन युवक नेते विक्रम ढोणे यांनी केले.

          जत तालुक्यातील विविध गावचे युवक, जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत नुकताच जत येथे एक   मेळावा  आयोजित केली होता. या मेळाव्यात युवक नेते   ढोणे बोलत होते.
     यावेळी ते बोलताना म्हणाले की,तालुक्यातील चालू असलेले जातीपातीचे राजकारण बंद करून इथल्या अनेक  प्रश्नांसाठी एका विचाराने लढायचे आहे,असा निर्धार तालुक्यातील युवकांनी केला आहे.
तालुक्यातील युवकांच्या बेरोजगाराची समस्या मोठी आहे. एकही रोजगाराचे केंद्र नाही .शेतीपुरक उद्योग निर्माण करून तालुक्यातील स्थलांतर कायम स्वरूपी थांबवण्यासाठी  दुरदृष्टीने रचनात्मक, धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठीच ही निवडणूक युवकांनी हातात घ्यायची ठरवली आहे.

No comments:

Post a Comment