Tuesday, September 24, 2019

जत-कवठेमहांकाळ रस्त्यावर खड्डेच खड्डे

अपघातांचे प्रमाण वाढले;प्रवाशांना पाठीचे, मणक्याचे आजार वाढले
जत,(प्रतिनिधी)-
जत-कवठेमहांकाळ या रस्त्याची अवस्था मोठी दयनीय झाली असून जागोजागी खड्डे पडले असून वाहनचालकांना खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अनेकांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

जत- कवठेमहांकाळ हा मार्ग सुमारे चाळीस किलोमीटर अंतराचा आहे. या दरम्यान डफळापूर, कोकळे, अलकूड ही गावे येतात.  जत आणि कवठेमहांकाळ या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दोन्ही शहरांसाठी आणि तालुक्यासाठी हा रस्ता मोठा महत्त्वाचा असून या लोकांना जत तालुक्यातल्या लोकांना सांगलीला जाण्यासाठी आणि सांगली, कवठेमहांकाळ येथील लोकांना विजापूर, चडचण हा मार्ग महत्त्वाचा आहे.  या मार्गावरून मोठ्या प्रमाणात दळणवळण चालते. मात्र  अलीकडच्या वर्षभरात या रस्त्याची अवस्था मोठी बिकट झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय खड्ड्यामुळे खडी उचकटून गेली आहे. तब्बल चाळीस किलोमीटर रस्ता हा खड्डेमय झाला आहे.
दुचाकी आणि चार चाकी वाहने चालवताना वाहन चालकांना  मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहने तर कामाला येत आहेतच पण चालकांचे हातपाय भरून येण्याचा प्रकार घडत आहे. या मार्गावर नियमित  प्रवास करणाऱ्या नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक या  प्रवाशांना पाठ दुखीचा आणि मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  वाहनेही लवकर कामाला येत आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मार्गावर मोठ्या अपघात मोठ्या प्रमाणात होत असून त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. रोज कुठे ना कुठे अपघात होत असून बळी जाणाऱयांची संख्याही मोठी आहे. मोदी सरकार आणि राज्याचे सरकार अपघात हो ऊ नये,म्हणून दंडाची रक्कम वाढवते आहे,पण अपघात होऊ नये, म्हणून रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment