Saturday, September 28, 2019

जत तालुक्यात विविध ठिकाणी पोषणयुक्त आहाराचे प्रदर्शन

( जत येथे पोषणयुक्त आहार कार्यक्रमात फळा-भाज्यांची वसुंधरा माता हा  जिवंत देखावा उभा करण्यात आला होता.)
जत,(प्रतिनिधी)-
येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्यावतीने राष्ट्रीय पोषण महिना अंतर्गत जत तालुक्यातील अंगणवाडी विभागात अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्याच बरोबर पोषणयुक्त आहाराचे प्रदर्शन मांडून त्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले.

केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषण आहार महिना म्हणून राबवण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार तालुक्यात विविध ठिकाणी पोषणयुक्त आहार प्रदर्शन घेण्यात आले. अनेक चविष्ट तसेच पोषणमूल्ये जपणारे अनेक पदार्थ तयार केले होते. जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने मोठ्या प्रमाणात शरीराला मिळेल असे पदार्थ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मांडले होते.
जत येथील पोषणयुक्त आहार प्रदर्शनाचे उदघाटन जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे,जतचे तहसीलदार सचिन पाटील, जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी बी  खरात, सहायक गटविकास अधिकारी अण्णासाहेब नानगुरे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर डी शिंदे, प्रकल्प अधीकारी सौ बी जे कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.  ह्यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याशी संवाद साधताना प्रशांत आवटे म्हणाले की , गतिमान युगामध्ये उत्तम शाररिक आरोग्यासाठी पोषणयुक्त आहाराचा समावेश आपल्या भोजनात असायला हवा. यावेळी जत शहरातून पोषण आहार रॅली काढणेत आली. यामध्ये फळे, भाज्यांची वसुंधरा माताचे देखावा केला होता
सदर कार्यक्रमाला श्रीमती मदने, माधुरी जोशी, पर्यवेक्षिका स्नेहल स्वामी ,दीपाली रजपूत ,कविता रोकडे ,जयश्री माळी  उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, नियोजन युनियन अध्यक्ष नादिरा नदाफ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व बिट प्रमुख तसेच प्रकल्पातील सर्व सेविका , मदतनीस यांनी मोलाचे कार्य केले.

1 comment: