Monday, September 16, 2019

लिव्ह इन रिलेशनशिपपेक्षा लग्न झालेल्या महिला अधिक सुखी


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दावा
लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहणार्या महिलांपेक्षा लग्न झालेल्या महिला या खूपच अधिक प्रमाणात आनंदी असतात, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आला आहे. महिलांसंदर्भात अभ्यास करणार्या पुण्यातील संघाशी संलग्नदृष्टी स्त्री अध्यासन प्रबोधन केंद्राच्या एका सर्वेक्षणातून हे निष्कर्ष समोर आल्याचे सांगण्यात आले आहेमहिलांविषयीच्यास्टेट्स ऑफ विमेननामक या सर्वेक्षण अहवालाचे येत्या 24 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
या प्रकाशनानंतर समाजातील महिलांच्या स्थितीशी संबंधित विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हावी यासाठी टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी प्रकाशन करण्यात येणार आहे. राजस्थानमधील पुष्कर येथे सुमारे तीन डझन संघाशी संलग्न संघटनांच्यासमन्वय बैठकीतया सर्वेक्षणातील निष्कर्षांवर चर्चा झाली. ’दृष्टीच्या प्रतिनिधींनी यावेळी एक सादरीकरण केले ज्यामध्ये सर्वेक्षणातील महत्त्वाचे निष्कर्ष समोर मांडण्यात आले.
या सर्वेक्षण अहवालात म्हटल्याप्रमाणे, लग्नामुळे महिलांना स्थिरता येते तसेच संबंधित महिलेचा अत्युच्च आनंद आणि कल्याणात वाढ होते. महिलांची मिळकत आणि आनंद याचा परस्पर संबंध नसल्याचेही या सर्वेक्षणातील निष्कर्षांमध्ये म्हटले आहे. जवळपास सर्व प्रकारची कामे करणार्या महिलांमध्ये ही बाब सारखीच असून अध्यात्मिक क्षेत्रात सर्मपित असलेल्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न नसतानाही त्या सर्वोच्च पातळीवरील आनंद अनुभवत असल्याचेही यात म्हटले आहे. तसेच आनंद आणि कल्याणाच्या पातळीमध्ये सर्वाधिक टक्केवारी पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी स्तरावरील स्त्रियांमध्ये दिसून आली असून सर्वात कमी टक्केवारी निरक्षर महिलांमध्ये दिसून आल्याचा दावाही यातून करण्यात आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कधी नाते तुटेल याचा भरवशा नसतो. तसेच लग्न ही संकल्पनाच त्यांना मान्य नसल्याने त्यांच्या आनंदीवृत्तीला मर्यादा येतात.
या सर्वेक्षणातून असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे की, 50 ते 60 या वयोगटातील महिला या सर्वाधिक आनंदी असतात. या सर्वसाधारणपणे सर्व कौटुंबिक जबाबदार्यांमधून मुक्त झालेल्या असतात त्याचा त्यांच्या मानसिक सकारात्मकतेकवर परिणाम होतो. मात्र, 60 वर्षे वयानंतरच्या महिलांमध्ये हा आनंद कमी व्हायला लागतो. कारण, या काळात महिलांना त्यांच्या जगण्याबाबत असुरक्षित वाटत असते. कारण त्यांच्यामध्ये आरोग्याचे प्रश्, त्यांच्यातील एकटेपणा कारणीभूत असतो.

No comments:

Post a Comment