माणसं कशाचीही पैज लावू शकतात.कोण ठराविक वेळेत लाडू खाणं. जिलेबी
खाणं. असं बरेच काही! शेवटी पैज जिंकणं महत्त्वाचं असतं.
म्हणतात ना, पैजेसाठी काय पण...! बघा ना, एका प्रवाशी वाहतूक करणार्या रिक्षावाल्याने चक्क पैजेखातर नऊ मिनिटात तब्बल 45 चहा कप प्याला. आणि पैज जिंकली. सध्या या पैजेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
सचिन सोपान शिंदे (वय 34) असे या युवकाचे नाव असून
तो इंदापूर तालुक्यातील भिवगण स्टेशन गावचा आहे. त्याची स्वत:
ची रिक्षा आहे. परवा दुपारी सहज गप्पा मारत असताना
मित्रांमध्येच पैज लावली गेली. त्याच्या मित्रांनी एक हजार रुपयांमध्ये
किटलीभर चहा संपवण्याची पैज . रवी कोळेकर, युवराज खटके, दिनेश अनभुले, किरण
कांबळे यांनी मिळून ही पैज लावली आणि सचिनने ती स्वीकारली. तिथल्या
हॉटेलाअतल्या किटलीत 45 कप चहा मावत होता. सचिनने तो किटलीभर गरम चहा परातीत ओतला आणि या बहाद्दराने 45 कप चहा घोट पित
अगदी नऊ मिनिटांत फस्त केला. पैजेचा विडा जिंकलाच पण त्याला थोडीशी
मळमळ वगळता फारसा कुठला त्रास झाला नाही. या सगळ्यापेक्षा त्याला
पैज जिंकल्याचा आनंद मोठा होता.
No comments:
Post a Comment