Tuesday, September 17, 2019

आठवडाभर 'बँका बंद'ने टेन्शन वाढणार


भारतीय बँक असोसिएशनच्या चार वेगवेगळ्या संघटनांनी विविध मागण्यांसाठी २६ व २७ सप्टेंबरला संपाचा इशारा दिला आहे. यात, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स, अशा चार संघटनांचा समावेश आहे.

या संघटनांनी २६ सप्टेंबरची मध्यरात्र ते २७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपयर्ंत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पुढच्या दिवशी चौथा शनिवार (२८ सप्टेंबर), रविवार (२९ सप्टेंबर) असे सुटीचे दिवस आहेत. तर सोमवार व मंगळवार (३0 सप्टेंबर, १ ऑक्टोबर) असे दोन दिवस बँक कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. त्यानंतर लगेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बँकांना सुटी राहील. संप आणि सुट्या मिळून आठवडाभर बँका बंद राहणार आहेत. हा संप झाल्यास बँका सलग आठवडाभर बंद राहण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास व्यवहार ठप्प पडण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, पुढील महिन्यातही बँक कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. कामाचा आठवडा सहाऐवजी पाच दिवसांचा करावा, ही प्रमुख मागणी असून बँक कर्मचारी नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अनिश्‍चित कालासाठी संपावर जाऊ शकतात. सध्या बँक कर्मचार्‍यांना एका आठवड्यात पाच तर एका आठवड्यात सहा दिवस काम करावे लागत आहे.
या संपात केवळ सरकारी बँकांतील कर्मचारी सहभागी होणार आहेत. दरम्यान, खासगी बँका सुरू राहतील. संपाला सर्व संघटनांचा पाठिंबा लाभला असून देशभरात संप पुकारण्यात आला आहे. याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. सरकारने संघटनांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेण्याची तयारी दर्शविल्यास संप मागे घेण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment