Friday, September 20, 2019

डफळापूर जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार स्पर्धा

जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा क्र. 2  मध्ये पोषण युक्त आहार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे साठ मुलींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय पोषण महिना अंतर्गत  शाळेत अनेक उपक्रम राबविण्यात आले.
केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषण आहार महिना म्हणून राबवण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार शाळेत पोषणयुक्त आहार स्पर्धा घेण्यात आल्या. चविष्ट तसेच पोषणमूल्ये जपणारे अनेक पदार्थ तयार केले होते. जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने मोठ्या प्रमाणात शरीराला मिळेल असे पदार्थ विद्यार्थ्यांनी मांडले होते.
 या वेळी संख पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता अश्विनी गायकवाड यांनी  मुलींशी हितगुज करताना म्हणाल्या की  गतिमान युगामध्ये शारीरिक आरोग्य चांगले, निरोगी शरीर, स्थूलतेपासून बचावासाठी असल्या पोषणयुक्त आहाराची  गरज आहे.
आरोग्याविषयी विविध प्रश्न व समस्येवर उपाय म्हणून डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  आशा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डफळापूर मंडल अधिकारी सलीम मुलाणी, कालवा निरीक्षक  नाईम शेख, केंद्रप्रमुख शंकर बेले, गोटू शिंदे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  संजय सूर्यवंशी होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक रेखा कोरे, अलका पवार, शंकर कुंभार, सुषमा झांबरे, उद्योगरत्न संकपाळ, किशोर शिवरकर यांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment