जाडर बबलाद( ता.जत) येथे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती रावसाहेब ईरापा कांबळे यांने पत्नीसह एकास लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नी मैना रावसाहेब कांबळे( वय २६ रा. जाडर बबलाद) व अमशिद्धा अपण्णा काटे( वय ५४ रा. जाडरबोबलाद) दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रावसाहेब ईरापा कांबळे याच्या विरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जाडरबोबलाद येथे रावसाहेब कांबळे व पत्नी मैना सोबत एकत्र राहतात. त्या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भांडण सुरू होते. मैना हिचाशी अमशिदधा याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय पती रावसाहेब याला आल्याने मंगळवारी रात्री अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून रावसाहेब ईरापा कांबळे यांने पत्नी मैना यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी चिडलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी सुरीने बेदम मारहाण केली. त्यावेळी हे भांडण सोडवण्यासाठी अमशिद्धा तेथे आले असता त्याच्यावरही लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद सुनिल अमशिदधा काटे यांनी उमदी पोलिसात दाखल केली असून तपास सपोनि दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.
No comments:
Post a Comment