जत,(प्रतिनिधी)-
राज्यभर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे मोर्चे व जेलभरो व रास्ता रोको या पध्दतीने प्रचंड व तीव्र आंदोलन करीत आहेत. दि.४सप्टेंबर रोजी कृती समितीच्या नेत्यांची शिवसेनापक्षप्रमुख उब्दवजी ठाकरे व आरोग्यमंत्री एकनाथशिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुखांनी तातडीने मागण्या मुख्यमंत्र्यांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा निर्णय त्वरित घेण्याची विनंती केली.
दि. ८ सप्टेंबर रोजी विद्युत व ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी कृती समितीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यासोबत नागपूर येथे भेट घडवून आणली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांशी
चर्चा करून मानधन वाढीचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिलांना वाढीव मानधन मिळण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीआणण्याच्या दृष्टीने मंत्रालयांमध्ये निमंत्रित केले होते. आज सुमारे ११ ते २.३० पर्यंत नेटचे कामकाज चालले. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनाचा प्रश्न आग्रहाने उपस्थित केला होता. मंत्रिमंडळाने आशा
व गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीवर सकारात्मक चर्चा
केली.त्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी कृती समितीच्या
नेत्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणली. आशा व गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीचे स्वतः समर्थन केले. कृती समितीने मानधनवाढीचा जीआर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनवाढीचा जीआर त्वरित काढण्याचे
ठोस आश्वासन दिले.
या शिष्टमंडळामध्ये कॉ. सलीम पटेल, दत्ता देशमुख, श्रीमंत घोडके व एम. ए. पाटील यांचा समावेश होता. कृती समितीने मानधनवाढीचा जीआर निघेपर्यंत शांततापूर्ण निदर्शने चालू
ठेवण्याचा आणि संपूर्ण कामकाजावरील बहिष्कार चालू ठेवण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment