Saturday, September 21, 2019

स्वतः बनवा आपल्या जीवनाचा सूर: रसिका शेखर

तिचा जन्म दुबईत तर वाढली अमेरिकेत. यूएसमध्येच तिने आपली संगीताची आवड पुढे नेली.तिच्या म्युझिक करिअरची सुरुवात 2011 मध्ये यूएसच्या एका वोकल गझल परफॉर्मर टूरने केली होती. यात उस्ताद गुलाम अली खान यांचा समावेश होता. नंतर ती भारतात आली आणि म्युझिकल त्रिकुट शंकर-एहसान- लॉय यांच्यासोबत काम केले. गझल, जज्जपासून बॉलिवूड म्युझिक पर्यंत सर्वत्र संचार केला. तिला सर्व स्वर-लहरी आवडतात. ही आहे बासरीवादक आणि गायिका रसिका.

नेहमी आपल्याला आपलं जीवन  धुक्यांनी वेढलेलं दिसतं. कळतच  नाही की,आपल्याला कुठे जायचं आहे. पण जर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर असं लक्षात येतं की, या धुक्यातूनच एक सूर उठतो. हा आपल्या आतून येणारा हा आवाज असतो. जर तुम्ही तो ऐकला तर तुम्हाला योग्य दिशा मिळून जाते. धुके सुटायला लागतं, तेव्हा तुमचे ध्येय दिसायला लागते. ती सांगते माझ्या बाबतीतही असंच घडलं.
तिला वाटतं की कुठलीही गोष्ट व्यर्थ जात नाही. तिला कुणीतरी विचारलं होतं, एक केमिकल इंजिनिअर आणि म्युझिशियन यांच्या दरम्यान आज तू कुठे आहेस? तेव्हा ती म्हणाली होती, केमिकल इंजिनिअर म्हणून ती अधिक विश्लेषणात्मक ,तार्किक आणि व्यवस्थेत आहे. म्युझिशियन म्हणून थोडी स्वप्नाळू, आत्मनिरीक्ष ण करणारी आणि संवेदनशील आहे. याचमुळे ती वेगवेगळ्या असलेल्या दोन्हींमध्ये  एका समान धाग्याचे सूत्र शोधण्यात यशस्वी होते.
संगीतामध्ये करिअर करण्याचे ध्येय बाळगलेल्या लोकांना तिचा सल्ला आहे की, पूर्ण हृदय आणि आत्म्याने ते जिंकू शकता. शिकणं कधी बंद होत नाही. स्वतःला संगीताला वाहून घ्या. आपले कान आणि हृदय उघडे ठेवा. जितके होईल तितके त्यात समरस व्हा.

No comments:

Post a Comment