Thursday, September 12, 2019

जिल्हा परिषद शाळांमध्ये शासन केंद्र प्रमुखांची भरती करणार

जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील केंद्र प्रमुखांची पदे आता स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये १०० गुण बुद्धीमत्ता व अभियोग्यता आणि १०० गुण शालेय शिक्षणातील नियम,अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह अशा एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि साक्षरता अभियानासंबंधी स्थापन केलेल्या कार्यबल गट समितीच्या शिफारसीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमध्ये सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी एकूण ४ हजार ८६० केंद्रीय शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या १० प्राथमिक शाळांकरिता एक, याप्रमाणात केंद्रप्रमुखाचे एक पद तयार करण्यात आले आहे. शासन निर्णयामध्ये केंद्रप्रमुखपदाच्या नेमणुकीसाठीची पद्धत निश्चित करण्यात आलेली आहे. या पद्धतीनुसार रिक्त पदे सरळसेवा, विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा, तसेच पदोन्नतीने ४०:३०:३० या प्रमाणात त्या-त्या निवड प्रक्रियेअंतर्गत अंतर्गत भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास व भूगोल या विषयांसाठी समप्रमाणात येणार आहे. विषयनिहाय भरतीचे प्रमाण प्रथम भाषा ३० टक्के, व्दितीय भाषा हिंदी २० टक्के, गणित व
विज्ञान १०० टक्के, सामाजिक शास्त्रे १०० टक्के, तसेच प्रथम भाषा मराठी, उर्दू यांचे प्रमाण ८०:२० राहील, असे नमूद करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने केंद्र
प्रमुखांच्या रिक्त पदांच्या संख्येचे रिक्तपदे सरळसेवा, विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा, तसेच पदोन्नतीने ४०:३०:३० या प्रमाणात तसेच भाषा, गणित, सामाजिक शास्त्रे, असे वर्गीकरण करून भरण्यात येणार आहेत. संबंधित परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार असल्याचा शासन निर्णय राज्याचे अवर सचिव स्वप्नील कापडणीस यांनी जाहीर
केला आहे.

No comments:

Post a Comment