Wednesday, October 9, 2019

जतमध्ये शिक्षकांसाठी बहुउद्देशीय सभागृह उभारण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात 1 हजार 200 च्यावर प्राथमिक शिक्षक संख्या आणि 470 च्या आसपास शाळा आहेतअनेकदा सर्व शिक्षक किंवा मुख्याध्यापकांच्या एकत्रित बैठका बोलवल्या जातात,मात्र जतमध्ये अशी एकही इमारत नाहीजिथे सर्व शिक्षक बसू शकतीलत्यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला खासगी शाळांपुढे हात पसरावे लागतातया शाळा सहकार्य करीत नसल्याने शिक्षकांना जागा उपलब्ध होईलतिथे भारतीय बैठक मारून सभा उरकावी लागतेयासाठी जिल्हा परिषदेने तालुकास्तरावर बहुउद्देशीय सभागृह बांधावेअशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

ग्रंथ व विज्ञान प्रदर्शनविविध स्पर्धाशिक्षकांच्या बैठका घेण्यासाठी  जतमध्ये पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे इमारत उपलब्ध नाहीतालुक्यात शिक्षकांची संख्या मोठी आहेत्यांची एकत्रित बैठक बोलावता येत नाहीत्यामुळे या बैठका जतसह माडग्याळ किंवा संख येथे बोलवाव्या लागतातयासाठी वेळ खर्ची पडतोमार्गदर्शन करणार्यांची संख्या अपुरी असल्याने अडचण निर्माण होतेजतमधल्या खासगी शाळांकडे अशा इमारती असल्या तरी या शाळा शिक्षण विभागाला सहकार्य करत नाहीतकाही ठिकाणी त्यांचेच विद्यार्थ्यांचे वर्ग भरत असल्याने अशा प्रकारची ऐसपैस जागा जतमध्ये उपलब्ध नाहीकित्येकदा शिक्षकांना जागा मिळेल तिथे भारतीय बैठक मारून सभा उरकाव्या लागतातसकाळी 11 ते 5 इतका कालावधी बसून सभेचे काम करणे कठीण आहेअनेकांना मुळव्याधगुडघेदुखीसह अन्य आजार आहेत.काहींच्या पायांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेतअशी अडचण असतानाही या शिक्षकांना बैठक मारून बसावे लागत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शिक्षक काही लहान मुले नाहीत की त्यांना भारतीय बैठक मारून सहा सहा तास बसवावेशिक्षण विभागाचा नाईलाज असल्याने शिक्षकही गप्प राहत आहेतमात्र यासाठी बहुउद्देशीय सभागृहाची आवश्यकता आहेतालुकास्तरीय विविध स्पर्धाविज्ञान प्रदर्शन असे अनेक उपक्रम वर्षभर चालत असतातखासगी शाळा आपल्या इमारती उपलब्ध करून देत नाहीतअनेकदा शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना या खासगी शाळांपुढे गयावया करावी लागतेही समस्या सुटण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बहुउद्देशीय मोठे सभागृह उभारावे व शिक्षण विभागाची अडचण दूर करावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment