Thursday, October 24, 2019

'जत'ला 'विक्रम पर्वा'ची सुरुवात

विक्रमसिंह सावंत 35 हजार  मताधिक्याने विजयी
जत,(प्रतिनिधी)-
काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचा दारुण पराभव करत काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून दिले. जत विधानसभा मतदारसंघात भापजची सलग पंधरा वर्षे सत्ता होती, ती आता संपुष्टात आली आहे. विक्रमसिंह सावंत यांना या निवडणुकीत 87 हजार 184 मते मिळाली तर विलासराव जगताप यांना 52 हजार 510 मते मिळाली. तिसऱ्या आघाडीच्या डॉ.रवींद्र आरळी यांना 28 हजार 715 मिळाली. यात विक्रमसिंह सावंत 34 हजार 674 इतक्या मोठ्या फरकाने विजयी झाले.

मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. तहसील कार्यालयाच्या समोरील धान्य गोदामामध्ये ही मतमोजणी होती. पहिल्या फेरीला सावंत यांना 1 हजार 333 मतांची आघाडी मिळाली तिथंपासून विक्रमसिंह सावंत सतत थोड्या फार फरकाने कायम आघाडीवर होते. ही आघाडी जगताप यांना तोडता आली नाही. विशेष म्हणजे तिसऱ्या आघाडीचे उमेदवार आणि भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. आरळी आणि जगताप यांच्या मतांच्या बेरजेपेक्षा अधिक मते सावंत यांना पडली आहेत. या दोघांच्या मतांच्या बेराजेपेक्षा सावंत यांना 5 हजार 959 मते अधिक मिळाली आहेत.  त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला,असेही म्हणता येत नाही.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत आमदार विलासराव जगताप 17 हजार मतांनी निवडून आले  होते. तर सावंत यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. सावंत 2014 च्या निवडणुकी पराभूत झाले असले तरी त्यांनी आपला संपर्क कायम ठेवला होता. जगताप यांच्याशी एकहाती टक्कर देत होते. जतला पाणी आणण्याचा मुद्दा सावंत यांनी उचलून धरला होताच, त्याचबरोबर भाजप-सेना युतीच्या तसेच कर्नाटकातील संबंधित मंत्र्याना भेटून जतला कृष्णेचे पाणी देण्याची मागणी करत राहिले. तुरची-बबलेश्वर या योजनेतून तालुक्यातील पूर्व भागातील गावांना पाणी मिळण्याबाबत आग्रही राहिले. शिवाय सावंत यांचा वैयक्तिक जनसंपर्क ही असल्याचा त्यांना फायदा झाला.
मतमोजणीच्या 21 फेऱ्या झाल्या. या फेरीनुसार झालेले मतदान असे: पहिल्या फेरी- विक्रम सावंत 3819,जगताप 2486, डॉ.आरळी 1326. दुसरी फेरी-सावंत-4163, जगताप 2227, डॉ. 2184. तिसरी फेरी- सावंत 4513, जगताप 1910, डॉ. 1847. चौथी फेरी- सावंत 4652, जगताप2331, डॉ. आरळी 1057. पाचवी फेरी- सावंत 4625, जगताप 3271, डॉ. आरळी 694. सहावी फेरी- सावंत 4308,जगताप 2167, डॉ. आरळी 2000. सातवी फेरी-सावंत 4244,जगताप 2602, डॉ.आरळी 1557. आठवी फेरी-4062, जगताप 3214,डॉ. आरळी 768. नववी फेरी- 4833,जगताप 2472, डॉ. आरळी 1771. दहावी फेरी- सावंत 5743, जगताप 2237, डॉ. आरळी 1305. अकरावी फेरी-सावंत 4112, जगताप 1961, डॉ. आरळी 1899. बारावी फेरी- सावंत 3259, जगताप 2201, डॉ. आरळी 2203. तेरावी फेरी- सावंत 3264, जगताप 3184, डॉ. आरळी 1449. चौदावी फेरी- सावंत 4023, जगताप 2967,डॉ. आरळी 1458. पंधरावी फेरी- सावंत 3815, जगताप 1990, डॉ.आरळी 1445. सोळावी फेरी- सावंत 4326, जगताप 2625, डॉ.आरळी 598.  सतरावी फेरी- सावंत 4290, जगताप 2482,डॉ. आरळी. आठरावी फेरी- 4695, जगताप 3003, डॉ. आरळी 1981. एकोणवीसावी फेरी- सावंत 4854,जगताप 3009,डॉ. आरळी 1270. विसावी फेरी- सावंत 4360, जगताप 3011, डॉ. आरळी 1088. एकवीसावी फेरी-  सावंत 453, जगताप 684, डॉ. आरळी 27. टपाली मतदान- सावंत 771, जगताप 476,डॉ. आरळी 203.

No comments:

Post a Comment