महिलांच्या सुरक्षेबाबतचा राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल जारी झाला आहे. त्यात महिलांसाठी उत्तर प्रदेश सर्वात असुरक्षित राज्य असल्याचे नमूद केले आहे. महिलांसाठी असुरक्षित राज्यांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले असून लक्षद्वीप महिलांसाठी सर्वात सुरक्षित प्रदेश असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार देशात महिलांवरील गुन्ह्यांमद्ये ६ टक्क्याने वाढ झाली आहे. २0१७मध्ये संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचाराचे ३,५९, ८४९ गुन्हे नोंद झाले आहेत. २0१६मध्ये हा आकडा ३,३८,९५४ एवढा होता.
सरकारकडून अनेक प्रयत्न करूनही महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण घटलेले नाही. उत्तर प्रदेशात महिलांवरील सर्वाधिक अत्याचाराची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराचे ५६,0११ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. म्हणजे संपूर्ण देशातील महिलांवरील अत्याचाराच्या १५.६ टक्के गुन्हे एकट्या उत्तर प्रदेशात नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या ३१,९७९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या यादीत पश्चिम बंगालचा तिसरा क्रमांक लागतो. पश्चिम बंगालमध्ये महिलांवरील अत्याचाराचे ३0,९९२ गुन्हे दाखल झाले आहेत. मध्यप्रदेशात २९,७८८ आणि राजस्थानात २५,९९३ गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणार्या राज्यांमध्ये लक्षद्वीपचा पहिला नंबर लागतो. लक्षद्वीपमध्ये महिलांवरील अत्याचाराचे केवळ ६ गुन्हे दाखल झाले आहेत. दादरा-नगर हवेली २0, दमन-दीवमध्ये २६, नागालँडमध्ये ७९ आणि पुदूचेरीमध्ये १४७ गुन्हे दाखल झाले आहेत.
महिलांवरील बलात्कार, सामुहिक बलात्कार आणि त्यानंतर त्यांच्या हत्या करण्याचे सर्वाधिक गुन्हेही उत्तर प्रदेशात नोंद झाले आहेत. उत्तर प्रदेशात हे एकूण ६४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आसाममध्ये २७, महाराष्ट्रात २६, मध्यप्रदेशात २१ आणि ओडिशामध्ये ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हुंडाबळीचे गुन्हे- उत्तर प्रदेश: २५२४, बिहार : १0८१, मध्यप्रदेश : ६३२, पश्चिम बंगाल : ४९९, राजस्थान : ४५७,
आत्महत्या करण्यास उत्तेजन देणे- महाराष्ट्र: ९५१, मध्यप्रदेश : ७0७, आंध्र प्रदेश : ५९७, तेलंगणा : ५0१, पश्चिम बंगाल : ४४३,
पती किंवा नातेवाईकांनी केलेले अत्याचार - पश्चिम बंगाल: १६८00, उत्तर प्रदेश : १२,६५३, राजस्थान: ११,५0८, आसाम : ९७८२, तेलंगणा : ७८३८
महिलांचे अपहरण- उत्तर प्रदेश: १४,९९३, महाराष्ट्र : ६२४८, बिहार : ६१८२, आसाम : ५५५४, मध्यप्रदेश : ५२00,
जबरदस्ती लग्नासाठी अपहरण- उत्तर प्रदेश: १२,३८२, बिहार : ४७७७, आसाम : ३१३८, मध्यप्रदेश : १३९२, राजस्थान : १३४१
१८ वर्षाखालील मुलींचे जबरदस्ती लग्नासाठी अपहरण- उत्तर प्रदेश: ३५५९, बिहार : २२१२, मध्यप्रदेश : १२0३, पंजाब : ७९५, गुजरात : ७0१,
महिलांची तस्करी- महाराष्ट्र: १२७, आसाम : १0७, तेलंगणा : ७७, पश्चिम बंगाल : ७१, आंध्रप्रदेश/ मध्यप्रदेश : ४२
बलात्कार- मध्यप्रदेश: ५५६२, उत्तर प्रदेश: ४२४६, राजस्थान : ३३0५, ओडिशा : २0७0, केरळ : २00३
१८ वर्षाखालील मुलीवर बलात्कार- मध्यप्रदेश: ३0६६, उत्तर प्रदेश : १५0४, ओडिशा : १२८५, छत्तीसगड : ११२0, केरळ : १0६९
वेश्या व्यवसाय- तामिळनाडू : २६६, महाराष्ट्र: ९१, कर्नाटक: ६६, आंध्रप्रदेश: २४, बिहार: १६
महिलांशी संबंधित सायबर क्राइम- आसाम: १६९, पश्चिम बंगाल: ६0, तेलंगणा: ३९, कर्नाटक: ३४, महाराष्ट्र: ३१,
बालिकांवरील अत्याचार (पॉक्सो कायदा)- महाराष्ट्र: २३८५, उत्तर प्रदेश: १५८0, कर्नाटक: १३0५, गुजरात: १२३३, पश्चिम बंगाल: ११८८.
No comments:
Post a Comment