Wednesday, October 23, 2019

सर्वसामान्यांमध्येही खादीची क्रेझ वाढली

जत,(प्रतिनिधी)-
दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी करत असताना तरुणांसह तरुणींमध्ये खादीची कपडे खरेदी करण्याकडे वाढता कल असल्याचे पाहावयास मिळत होते. विशेष म्हणजे खादीच्या लिनन कॉटनकिंग, केंब्रिज या ब्रँडच्या खादीला मागणी वाढली असल्याचेही दुकानदारांकडून सांगण्यात आले. पारंपरिक कुर्ते, जीन्ससह बेसकोट व प्रिंटेड रेडिमेडला खरेदीवर ग्राहकांचा जोर होता.
सध्या हातमागावर तयार होणार्‍या मुलायम कपडे वापरण्याचा ट्रेंड वाढत आहे. त्यालाही कारणही तसेच आहे.
हातमागावरील कपड्यांमुळे लुक तसेच मुलायमपणा ग्राहकांना आकर्षित करत आहे. डेनिम व कॉटन ट्रेंड यामध्येसुध्दा प्लेन व प्रिंटेड पर्याय खरेदीदारांसाठी दुकानदारांकडून उपलब्ध करून दिला जात आहे. खादीच्या शर्टचे सेल जागोजागी दिसत आहेत. खादीचे कपडे वापरण्याकडे नागरिकांचा विशेष कल दिसतो आहे. यामध्ये खादीतला कुर्ता, लेडीज कुर्ता, ड्रेस मटेरियल, पुरुषासाठीचे रूमाल, लुंगी, लहान मुलींसाठी कॉटनमधील परकर पोलकं, मुलांसाठी धोती कुडता, हातमागावर विणलेल्या साड्या, कपड्यांचे तागे, धोतर, अगदी कापडी हॅण्डबॅगसुध्दा तयार केल्या जातात.
मोठमोठय़ा कापोर्रेट कंपन्यांमध्येही हातमागावरच्या कपड्यांना मागणी आहे. हातमागाच्या कपडे विक्रीतले मोठे ब्रॅण्ड या वस्तू खासगी कारागिरांकडून कमी किंमतीत विकत घेतात आणि दुप्पट नफा कमवतात. तसेच हातमागावरचे कपडे विकत घेऊन स्वत:च्या ब्रॅण्डची जाहिरात करणारेही आहेत. मात्र, याच्या खर्‍या कारागिरापयर्ंत मेहनतीचा मोबदला पोहोचत नाही. आजही कॉटनच्या वस्तू वापरण्यामागे मुख्य कारण दिसते ते म्हणजे उन्हाळ्यात या कपड्यांमुळे थंड आणि थंडीत उबदारपणा जाणवतो. शिवाय शरीराला कोणताही दुष्परिणामही याने होत नाही. अशा बहुगणी कपड्यांना पूर्वीपेक्षाही मागणी वाढली आहे.
खादीचा ट्रेंड नजाकतदार आहे, व्हाईट कॉटन खादीमध्येच बारा ते तेरा प्रकार आहेत. महिलांसाठी लाछा, ट्रेंडी कुर्ता, पारंपरिक सलवार कमीज, साड्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असून सवलतीच्या योजनांमुळे महिला वर्गाची दिवाळी खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. रेडिमेड व पारंपरिक वस्त्रांना ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. खादीचे कुर्ते, महिलांसाठी साडी, ड्रेस मटेरियल, टॉप यांना चांगली मागणी आहे. तर, लहान मुलींसाठीचे परकर पोलकं विशेष पसंतीला उतरले आहे. अवघ्या रुपयांपासून ते हजार किंमतीपयर्ंतची प्रत्येक कापडी वस्तू ही हातमाग आणि चरख्यावर तयार झालेली आहे.

No comments:

Post a Comment