सांगली, (प्रतिनिधी)-
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सांगली जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघात एकूण 23 लाख 76 हजार 304 मतदारांपैकी आज अंदाजे सरासरी 65.98 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतांचा अंतिम ताळेबंद लागल्यावर यात वाढ अथवा घट होऊ शकते, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान झाले. आज झालेल्या मतदानावेळी मतदारांसाठी वैद्यकिय सुविधा, पाळणाघर, दिव्यांग मतदारांसाठी रँप, व्हीलचेअर, ने-आण आदि दर्जेदार सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आज रात्रीपासूनच ठिकठिकाणाहून मतदानयंत्रे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा होतील व कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येतील.
जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 5.95 टक्के, 11 वाजेपर्यंत 17.46 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 33.88 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 48.33, तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61.31 टक्के मतदान झाले होते.जिल्ह्यात मतदारसंघनिहाय सायंकाळी मतदान संपेपर्यंत झालेली मतदानाची अंदाजे सरासरी टक्केवारी व मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे - 281-मिरज विधानसभा मतदारसंघात 325626 मतदारांपैकी 55.13 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 282- सांगली विधानसभा मतदारसंघात 323945 मतदारांपैकी 56.25 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 270746 मतदारांपैकी 72.14 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 284-शिराळा विधानसभा मतदारसंघात 291779 मतदारांपैकी 74.01 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात 277873 मतदारांपैकी 72.27 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 286-खानापूर विधानसभा मतदारसंघात 322343 मतदारांपैकी 68.35 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात 292848 मतदारांपैकी 67.99 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 288-जत विधानसभा मतदारसंघात 271144 मतदारांपैकी 64.45 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अशा एकूण 2376304 मतदारांपैकी 65.98 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पावसाने उघडीप दिल्याने युवा, पुरूष, स्त्री, ज्येष्ठ, दिव्यांग अशा सर्वच वयोगटातील मतदारांनी उत्साहाने मतदान करत लोकशाहीतील मतदानाचा आपला महत्त्वपूर्ण हक्क बजावला.
No comments:
Post a Comment