Monday, October 7, 2019

राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला

जत,(प्रतिनिधी)-
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभूतपूर्व यशाचे स्वप्न पाहत निवडणूक प्रचारासाठी दिवसरात्र एक करत आहेत. दरम्यानच्या काळात फडणवीस सरकार राज्याच्या विकासाचा आलेख उचावत असल्याचा दावा सतत करत असले, तरी देखील दुसरीकडे राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सन २0१४ मध्ये जेव्हा फडणवीस सरकार सत्तेत आले, त्यावेळी राज्यावर एकूण १.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, जून २0१९ पयर्ंत हा कर्जाचा डोंगर वाढत जात तो ४.७१ लाख कोटी रुपये इतका झाला आहे.
या व्यतिरिक्त फडणवीस सरकारने सुमारे ४३ हजार कोटी रुपयांच्या योजनांसाठी बँकेची हमी दिलेली आहे.
तथापि, गेल्या पाच वर्षांच्या काळात राज्याच्या सकल घरेलू उत्पादनातही वाढ झाली आहे. माजी वित्त सचिव सुबोध कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जेव्हा आपण राज्याच्या एकूण कर्जाबाबत बोलत असतो तेव्हा राज्यातील योजनांना देण्यात आलेल्या हमी देखील गांभीर्याने घेण्याचा आवश्यकता आहे. ज्या संस्थांनी घेतलेले कर्ज चुकवले नाही, तर राज्य सरकारला यासाठी पुढे येणे गरजेचे असते.
वर्ष २0१६-१७ मध्ये राज्य सरकारने ७३0५ कोटी रुपयांच्या कजार्साठी हमी दिली होती. वर्ष २0१७-१८ मध्ये या हमीत वाढ होत ती २६६५७ रुपयांपयर्ंत पोहोचली होती. हे प्रामुख्याने एमएमआरडीएने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी, त्याच बरोबर मेट्रो-४ प्रकल्पासाठी १९0१६ कोटी रुपयांच्या कजार्ला हमी दिल्यामुले झाले आहे.

No comments:

Post a Comment