Sunday, October 27, 2019

जत शहरात गॅसचा तुटवडा

जत,(प्रतिनिधी)-
शहरासह तालुक्यात ऐन सणासुदीच्या दिवसांत सिलिंडरची मोठय़ा प्रमाणात टंचाई भासत आहे. पैसे मोजूनही नागरिकांना सिलिंडरसाठी दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. ऑनलाइन बुकिंगनंतरही नागरिकांना सिलिंडरसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक कामासाठी वापर होत असल्याने हा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

   शहरासह तालुक्यात मागील काही दिवसापांसून सिलिंडरची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. ऑनलाइन बुकिंग प्रणाली सुरू झाल्यानंतरही सिलिंडरसाठी नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. आपली कामे बाजूला ठेवून त्यांना संबंधित गॅसपुरवठा एजन्सीच्या कार्यालयासमोर  ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. मागील काही दिवसांपूर्वी अशा प्रकाराला संबंधित एजन्सीधारक दोषी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनुदानित सिलिंडरची किंमत 650 रुपये, तर विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 1200 रुपये आहे. याव्यतिरिक्त अधिक रक्कम घेऊन शहर व तालुक्यात  सिलिंडरची अनधिकृतरीत्या विक्री होत असल्याचे प्रकारही सुरू आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना विशेषत: महिलावर्गाला अधिक मनस्ताप करावा लागत आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या जतमधील वितरकाच्या कार्यालयासमोर गर्दी दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment