Sunday, October 27, 2019

उमदी-विजापूर महामार्गाची दुरवस्था

जत,(प्रतिनिधी)-
 उमदी-विजापूर (विजयपूर)  महामार्गाची मोठी दुरवस्था झाली असून वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.  तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

उमदी- विजापूर महामार्गावर हळ्ळी ते बालगावमधील पुलाची पाईप फुटून मोठे भगदाड पडले आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने  रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. आतापर्यंत या पुलावर चार अपघात झाले आहेत. या रस्त्याची रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे हा महामार्ग नावालाच आहे. या रस्त्याची रुंदी  प्रत्यक्षात बारा फूटच रस्ता आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या पूर्णपणे खचलेल्या आहेत. साईडपट्ट्या भरुन घेणे गरजेचे आहे.
 हळ्ळी गावाजवळील पुलाला पडलेल्या भगदाडामध्ये कार दुर्घटना  घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी ती वाहने बाहेर काढून दिली. असुरक्षित पुलामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाची व रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गातून होत आहे.
मालवाहू ट्रक अडकून पडल्याच्या घटना घडल्या असल्याने भविष्यात या मार्गाचा धोका मोठा आहे. त्यामुळे या मार्गाचे दुरुस्तीचे काम तातडीने होणे आवश्यक आहे.  अहमदनगर-  विजापूर महामार्गावर अहमदनगर ते उमदीपर्यंतच्या महामार्गावरील काम पूर्ण होत आले आहे, परंतु उमदी ते विजापूरपर्यंत अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरु नाही. हे काम पूर्ण करावे. यामुळे या रस्त्यावर होणारे अपघातांचे प्रमाण कमी होईल.

No comments:

Post a Comment