जत,(प्रतिनिधी)-
दिवाळी सणाच्या नंतर यंदा कर्तव्य आहे, असे म्हणणार्यांना आता तुळशी विवाह झाल्यानंतर आठ दिवसानंतर लग्नाचे बाशिंग बांधता येणार आहे. परंतु यंदा डिसेंबर महिन्यापासून गुरुचा अस्त असल्यामुळे महिनाभर शुभ मुहूर्त नाहीत. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४६ शुभमुहूर्त आहेत. येत्या २७ तारखेला लक्ष्मीपुजन, तर १२ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह होणार आहे.

यंदा कर्तव्य असणार्या घरात दिवाळीपेक्षा लग्नसराईची घाई बघायला मिळते. दरम्यान, २0१७ मध्ये शुक्राच्या अस्तामुळे १६ डिसेंबर ते १ फेब्रुवारी या काळात लग्नाच्या तारखा नव्हत्या अन संपूर्ण लग्नसराईत ८२ तारखा होत्या. याबरोबरच २0१८ मध्ये आलेल्या गुरु अस्तामुळे एक महिना उशिराने लग्नसराई सुरु झाली. यातच संपूर्ण लग्नसराईसाठी ८६ मुहूर्त होते. यावर्षी पावसाळा जोरदार झाला आहे. त्यामुळे तुळशी विवाहानंतर नोव्हेंबरमध्ये असलेल्या चार मुहूर्तावर विवाह सोहळ्यांची धूक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात एकूण ११ मुहूर्त आहेत. ते साधण्याची लगबग सुरु झाल्याचे दिसते. शहरी भागात बहुतांश ठिकाणी मंडप टाकण्याची अडचण भासते. या पार्श्वभूमीवर आतापासूनच मंगल कार्यालयांच्या बुकिंगला प्राधान्य देण्यात येत आहे.डिसेंबरपासून गुरुचा अस्त; महिनाभर शुभमुहूर्त नाहीत.
अशा आहेत विवाह तारखा
नोव्हेंबर २0१९-२0, २१, २३, २८ डिसेंबर १, २, ३, ६, ८, ११, १२ यानंतर गुरु अस्त असल्यामुळे मुहूर्त नाही. थेट जानेवारी २0२0- १८, २0, २९, ३0, ३१, फेब्रुवारी २0२0- १, ४, १२, १४, १६, २0, २७, मे- २, ५, ६, ८, १२, १४, १७, १८, १९, २४, जून- ११, १४, १५ असे एकूण ४६ शुभमुहूर्त असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा तारखा कमी, गुरु अस्तामुळे महिनाभर ब्रेक गतवर्षी सुरु अस्त असतानाही मागील वर्षी ८६ शुभमुहूर्त होते.
No comments:
Post a Comment