Saturday, October 19, 2019

राज्यात 18 ते 25 वयोगटातील 1 कोटी मतदार

राज्यात १८ ते २५ वयोगटातील १ कोटी ६ लाख ७६ हजार १३ तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये ६0 लाख ९३ हजार ५१८ युवक तर ४५ लाख ८१ हजार ८८४ युवती आहेत. ६११ तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.  ४ ऑक्टोबर २0१९ पयर्ंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये ८ कोटी ९९ लाख ३६ हजार २६१ मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण ५ हजार ५६0 अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष ४ हजार ५४ आहेत तर १ हजार ५0६ अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे.

मागील निवडणुकीतच कमी झाली होती संख्या
मागील निवडणुकीच्या तुलनेत राज्यातील मतदारांच्या संख्येत भरपूर वाढ झाल्याचे जरी दिसत असले तरी प्रत्यक्षात फारशी वाढ झालेली नाही.
२00९ मध्ये महाराष्ट्रातील एकूण मतदार ७ कोटी ५९ लाख ७२ हजार ३१0 होते. तर २0१४ मध्ये एकूण मतदार ८ कोटी ३५ लाख १५ हजार ४२५ असल्याची नोंद आहे. राज्यात ३१ ऑक्टोबर २0१९ पयर्ंत एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६00 मतदारांची नोंदणी झाली आहे.
१५ हून अधिक मतदारसंघात २0१४ पेक्षा २00९ मध्ये अधिक मतदार
विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये १५ हून अधिक मतदारसंघात २0१४ पेक्षा २00९ मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहे. नागपूर दक्षिण पश्‍चिम, नागपूर मध्य, डहाणू, मुलुंड, कलिना, वांद्रे (पश्‍चिम), धारावी, वडाळा, माहिम, वरळी, भायखळा, मुंबादेवी, कुलाबा शिवाजीनगर, पुणे कन्टोन्मेंट आणि सोलापूर शहर (मध्य) या मतदारसंघात २0१४ पेक्षा २00९ मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहेत.
नागपूर दक्षिण -पश्‍चिममध्ये २00९ मध्ये ३ लाख ५१ हजार 0२१ मतदार असल्याची नोंद आहे, तर २0१४ मध्ये ३ लाख ४१ हजार ३00 मतदार असल्याची नोंद आहे.नागपूर मध्य मतदार संघामध्ये २00९ मध्ये ३ लाख ४ हजार ४८७ मतदार असल्याची नोंद आहे तर २0१४ मध्ये २ लाख ९२ हजार ७१६ मतदार असल्याची नोंद आहे. याप्रमाणेच इतर बारा मतदारसंघातही २0१४ पेक्षा २00९ मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहे.

No comments:

Post a Comment