बाबरवस्ती शाळेत 'तंबाखू मुक्त शाळा' उपक्रम
जत,(प्रतिनिधी)-
सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये 'तंबाखू मुक्त शाळा' अभियान राबवले जात आहे. या उपक्रमाअंतर्गत जत तालुक्यातील पांडोझरी भागातील बाबरवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ' तंबाखू मुक्त शाळा' अभियांतर्गत दिवाळी सणानिमित्त 'एक म्हणती... व्यसनमुक्ती'साठी हा उपक्रम राबविण्यात आला.
देशाची नवी पिढी व्यसनमुक्त राहावी म्हणून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन जनजागृती केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिलीप वाघमारे होते. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सविता मोटे,उपाध्यक्षा ललिता बाबर,यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरी अंगणात मातापालक यांनी सार्वजनिक ठिकाणी रांगोळी काढून पणत्या प्रज्वलित केल्या आणि 'एक पणती प्रकाशाची','एक पणती आरोग्याची', 'आम्ही व्यसनमुक्तीचे शिलेदार', 'लावणार एक पणती व्यसनमुक्तीची',' एक पणती व्यसनमुक्तीची' असे असे संदेश दारोदारी आणि शाळेमध्ये लिहिण्यात आले होते. यावेळी व्यसनमुक्त व आरोग्यसंपन्न परिवार व समाज राहावा यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रार्थना केली.
व्यसन हे माणसाच्या आयुष्यात नाश करते परिवारांच्या समाजातील मान सन्मानाचा स्तर खालावून अधोगतीला नेते व्यसनमुक्त राष्ट्रनिर्मितीसाठी समाजातील व्यक्ती व विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी वृद्धींगत व्हाव्यात आणि मुले समाजातील व्यक्ती व्यसनापासून दूर राहावीत हा उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी शिक्षक अनिल पवार व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शाळेत राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे, शिक्षण विस्ताराधिकारी तानाजी गवारी,केंद्रप्रमुख रमेश राठोड ,रामचंद्र राठोड,काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष लखन होनमोरे व सलाम मुंबई फाऊंडेशन प्रकल्प व्यवस्थापक अजय पिलणकर यांनी कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment