Thursday, October 31, 2019

आजपासून बदलणार बँकांचे नियम, वेळापत्रक


जत,(प्रतिनिधी)-
आज १ नोव्हेंबरपासून देशभरात अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. या नव्या नियमांचा दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येतआहे. नव्या नियमांबाबत जागरुक राहणे गरजेचे असून, या नव्या बदलांमुळे अनेकांना नुकसानही सहन करावे लागणार आहे.

यासोबतच सार्वजनिक बँकांच्या वेळापत्रकातही बदल होणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार, निवासी क्षेत्रातील सर्व बँका सकाळी ९ वाजता उघडतील आणि संध्याकाळी ४ वाजेपयर्ंत कामकाज सुरु राहील. तर व्यापारी क्षेत्रातील वगार्साठी बँकांची कामकाजाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपयर्ंत असणार आहे. तर उर्वरित सर्व बँका सकाळी १0 ते सायंकाळी ५ वाजेपयर्ंत सुरु राहतील. १ ऑक्टोबरपासून एसबीआय बँकेच्या नियमात काही बदल करण्यात आले होते. एसबीआय यांच्या नियमांनुसार, आता ग्राहकांना २५000 रूपयांपयर्ंत सेव्हिंग असणार्‍यांना ८-१0 फ्री एटीएम ट्रान्झ्ॉक्शन मिळणार आहेत. तर एसबीआयच्या एटीएममधून केलेले सारे व्यवहार हे मोफत आहेत. मात्र इतर बॅंकेच्या एटीममधून पैसे काढल्यास मेट्रो सिटीमध्ये ५ आणि इतर शहरांमध्ये ३ मोफत ट्रान्झ्ॉक्शन मिळणार आहेत. नव्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेल्यापैकी बँकेतील व्याजदर, डिजिटल पेमेंट, बँकांची कार्यालयीन वेळ यासह एअरसेल सेवा बंद यांचा समावेश आहे. त्यामुळे या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम होणार आहे. या बदललेल्या नियमांमुळे थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. देशभरातील बँकांचे कार्यालय उघडण्याची वेळ एकच असावी, यासाठी हा नवीन प्रस्ताव देण्यात आला होता. गेल्या जून महिन्यात यासंदर्भात बँकिंग विभागाने बैठकही घेतली होती. त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बँका उघडण्याची वेळ ठरविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
एसबीआयने या आधी ९ ऑक्टोबरला घोषणा केली होती, की १ लाख रुपयांपासून डिपॉझिटवर व्याजदर 0.२५ टक्के घटवून ३.२५ टक्के करण्यात आले आहे. तसेच १ लाखांहून जास्त डिपॉझिट केलेली रकमेवरच्या व्याजाला रेपो रेटशी जोडण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाने १ नोव्हेंबरपासून पेमेंट संदर्भात काही नियम बदलले आहेत. ग्राहक किंवा मर्चेंट्स यांच्याकडून डिजिटल पेमेंटवर कोणताही कर लागणार नाही अथवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. दरम्यान हा नियम ५0 कोटींपेक्षा जास्त टर्नओवर असणार्‍या कंपन्यांना लागू आहे. इलेक्ट्रॉनिक मोडचा वापर करून पेमेंट केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही
नवे वेळापत्रक 
बँकांच्या वेळेसंदर्भातील इंडियन बँक्स असोसिएशनच्या आदेशावर जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीने नागपूर जिल्हातील राष्ट्रीयकृत बँकेच्या कामकाजाची वेळ निश्‍चित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता, राष्ट्रीयकृत बँका उद्या १ नोव्हेंबरपासून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुल्या राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ग्राहकांना सकाळी १0.३0 ते दुपारी ४ पयर्ंत बँक ग्राहकांकरिता सुरू असायच्या. उद्या शुक्रवार १ नोव्हेंबरपासून आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ पयर्ंत बँकिंग सेवेचा फायदा घेता येणार आहे. दरम्यान, निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र तसेच अन्य कार्यालयांसाठी बँकेत आर्थिक व्यवहारासाठी वेगवेगळे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार निवासी भागातील नागरिकांसाठी सकाळी ९ ते दुपारी ३ पयर्ंत. मार्केट क्षेत्रातील व्यापायांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पयर्ंत आणि अन्य शाखा व कार्यालयांसाठी सकाळी १0 ते दुपारी ३ पयर्ंत वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार बँकेच्या व्यावसायिक शाखा सकाळी ११ ते सायंकाळी ५ पयर्ंत असेल. बाजारपेठ भागातील शाखा तसेच निवासी शाखा या सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सेवेत असेल. याव्यतिरिक्त अन्य शाखा ही सकाळी १0 ते दुपारी ४ पयर्ंतची वेळ निश्‍चिती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment