Wednesday, October 9, 2019

सांगली जिल्ह्यात 200 जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारती

सर्वाधिक 48 इमारती जत तालुक्यात;पाडण्याची प्रक्रिया संथ 
जत,(प्रतिनिधी)-
सोलापूर जिल्ह्यात शाळेची इमारत पडून तीन मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. परवा जत तालुक्यातील माडग्याळ येथील शाळेची इमारत रात्री पडली त्यामु़ळे जीवीत हानी झाली नाही.मात्र पावसाळ्यात अशा धोकादायक इमारती पडण्याची भीती अधिक असते. सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह विविध विभागाच्या  धोकादायक इमारतींची संख्या 200 च्यावर आहे. तर आतापर्यंत साडेतीनशे इमारती पाडण्यात आल्या आहेत. काही अनर्थ घडू नये म्हणून  या इमारती पाडून निर्लेखन करण्याची आवश्यकता आहे.
सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह आरोग्य केंद्र,ग्रामपंचायतीच्या 548 इमारती धोकादायक होत्या. त्यांपैकी साडे तीनशे इमारतींवर हातोडा चालवण्यात आला आहे ,अद्याप 200 खोल्या धोकादायक स्वरूपात आहेत.त्या पाडण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्याचा वेग फारच कमी आहे.त्यामूळे या इमारती अडचनीच्या ठरल्या आहेत.या 200 धोकादायक इमारतींपैकी सर्वाधिक इमारती या जत तालुक्यातल्या आहेत. 48 इमारती जत तालुक्यात धोकादायक आहेत. त्याखालोखाल 27 इमारती वाळव्यात आहेत. 23 इमारती आटपाडीत आहेत. याशिवाय शिराळा  17,मिरज 16,कवठे महांकाळ 19 ,विटा 14, कडेगाव 13 आणि तासगाव 16 इमारती धोकादायक आहेत.सर्वात कमी संख्या पलूस तालुक्यात असून तिथे फक्त पाच इमारती धोकादायक आहेत.
जिल्ह्यात 2009 पासून एकूण 262 शाळा धोकादायक अवस्थेत होत्या. आतापर्यंत 189 शाळा पाडण्यात आल्या. अजून 73 शाळा बाकी आहेत.ग्रामपंचायतीच्या 199 पैकी 111 इमारती आतापर्यंत पाडण्यात आल्या असून अजून 88 इमारती आहे त्या अवस्थेत आहेत. आरोग्य विभागाच्या फारच कमी म्हणजे 28 इमारती धोकादायक आहेत.यातल्या 13 इमारती पाडण्यात आल्या असून अजून 15 इमारती बाकी आहेत.शाळा खोल्या, आरोग्य आणि ग्रामपंचायत यांच्या 350 खोल्या पाडण्यात आल्याने जिल्हा परिषदेला 1 कोटी 33 लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
200 इमारती अजून धोकादायक स्थितीत आहेत.यात शाळांची संख्या सर्वाधिक आहे. यापासून कोणताही धोका पोहचू नये यासाठी या खोल्यांमध्ये वर्ग बसवू नयेत, असे आदेश शाळांना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment