Tuesday, October 22, 2019

ग्रुपमध्ये सामील करून घेण्यासाठी आता युजरची परवानगी

व्हाट्सएपचे नवे फिचर
जत,(प्रतिनिधी)-
 दररोज कुणीतरी आपल्याला नवीन व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतो. त्यामुळे ग्रुप्सची संख्या खूपच वाढते. आपली इच्छा नसली तरीही लोक युजरला आपापल्या ग्रुपमध्ये सामील करून घेतात. आता हे टाळता येणार आहे. मात्र आता युजरने परवानगी दिली तरच कुणीही नव्या ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकेल. व्हॉट्सअॅपमध्ये हे नवे फीचर आता येणार आहे.

व्हॉट्सअॅप या इन्स्टंट मेसेंजिंग अॅपने काहीच महिन्यांपूर्वी हे फीचर दिले होते. पण आता त्यात वाढ आणि काही बदल करून ते नव्याने देण्यात येणार आहे. ग्रुप प्रायव्हसी सेटिंगमध्ये असलेले हे फीचर अॅण्ड्रॉइड आणि आयओएस युजर्सना दिले गेले आहे. व्हॉट्सअॅप अपडेट कराल तर या नव्या फीचरबाबत सांगितले जाणार आहे. त्यामुळे ज्यांना या फीचरबाबत माहीत नसेल त्यांनाही ते माहीत होईल. विशेष म्हणजे या फीचरमुळे कॉन्टॅक्टमधील कोण तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करू शकेल हेही आपल्याला ठरविता येणार आहे.
असे आहेत पर्याय...
ग्रुप प्रायव्हसीमध्ये याआधी 'एव्हरीवन', 'माय कॉन्टॅक्ट्स' आणि 'नोबडी' असे तीन पर्याय देण्यात आले होते. यातील नोबडी हा पर्याय निवडला तर कुणी तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करू इच्छित असेल तर तो तुमच्याकडे इन्विटेशन रिक्वेस्ट पाठवू शकतो. ती स्वीकारली तरच तो तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करू शकतो. मात्र आता व्हॉट्सअप अपडेट केल्यानंतर ग्रुप प्रायव्हसीमधील 'नोबडी' हा पर्यायच काढून टाकण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment