Thursday, October 31, 2019

सावधान!मित्राने पाठवलेली एखादी लिंक घातक ठरू शकते

जत,(प्रतिनिधी)-
सणवार आले की सोशल मीडियावर एखादी लिंक पाठवून मित्रांची मज्जा घेणे ही आजकालच्या काळात खूपच चलनाची गोष्ट झाली आहे. गणेशोत्सवापासून झालेली सणांची सुरुवात दिवाळी आणि पुढे नूतन वर्षापर्यंत सुरूच राहते. यात सोशल माध्यमांवर अग्रेसर असलेले 'नेटकरी' सातत्याने काही ना काही नित्यनवीन आणतच असतात. गंमत म्हणून अधिकाधिक लोक त्या पाहतातही. पण नेमकी हिच गोष्ट घातक ठरू लागली आहे.

सोशल मीडियावर मित्रांनी पाठविलेल्या लिंकवर काहीतरी आश्‍चर्यकारक दिसेल किंवा काही तरी बक्षीस भेटेल या आशेने बरेच लोक अशा लिंक पाहतात.पण अशा लिंक धोक्याच्या असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. तसेच गिफ्टच्या प्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लीक न करता डिलीट मारणेच योग्य ठरणार आहे.
सोशल मीडियावर 'मॅजीक' दाखविणार्‍या लिंक फिरत असतात. अशाप्रकारच्या लिंक सातत्याने फिरत आहेत. या लिंकच्या माध्यमातून काहीतरी आश्‍चर्यकारक दिसेल या आशेने नागरिकांकडून अशा लिंकवर क्लिक केले जाते. पण या लिंक हॅकरनी बनविल्या असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या लिंकना उघडणार्‍यांची व्यक्तीगत माहिती हॅकरकडे पोहचण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या लिंक लगेच 'डिलीट' कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. असामाजिक तत्वांकडूनही या लिंकचा वापर केला जाऊ शकतो, त्यामुळे या गोष्टींबद्दल वेळीच सावध होणे गरजेचे आहे. अशा लिंकच्या माध्यामतून असामाजिक तत्व एखाद्याची व्यक्तीगत माहिती मिळवून अनेक असामाजिक कारवायात तिचा वापर करू शकतात, तसेच अनेक पौढ साईटवर अनेकांचे फोटोही अपलोड करू शकतात. तसेच आपली मिळालेली व्यक्तीगत माहिती त्या साईटवर अपलोड करून संबंधित व्यक्तीची बदनामीही करू शकतात. त्यामुळे अशा लिंक अगदीच जवळच्या मित्र किंवा नातेवाईकाने पाठविल्या असल्या तरी त्या लगेच डिलीट कराव्यात. आजकाल बँक खात्यातून पैसे गायब होण्याच्या घटना सातत्याने पहावयास मिळत आहेत. अशाच प्रकारच्या लिंकच्या माध्यमातून मिळविलेल्या माहितीच्या आधारे असे प्रकार घडत असल्याची माहिती पुढे येत आहे. लिंकच नाही तर अनेक अँप ज्यांची 'जीबी' कमी असते आणि जे बहुतेक मोफत असतात, अशा अँप पासूनही सावध राहण्याचा इशारा  दिला जात आहे. अशाप्रकारच्या अँपला डाऊनलोड करतांना आपली बरीच माहिती भरावी लागते. हिच माहिती अशाप्रकारचे अँप अनेक कंपन्यांना पुरवितात. यातुनच त्यांची कमाई होत असते. एखाद्या व्यक्तीचा व्यक्तीगत डाटा विकणे हेच या कंपन्यांचे काम असते. ही माहिती ते इश्योरन्स कंपन्या, बीपीओ आणि असामाजिक तत्वांना पुरवित असतात, त्यामुळे अशाप्रकारच्या लिंक, अँप हे आपल्याला घातक ठरू शकतात. याबद्दल काळजी घ्यावी . विशेषत: तरुण आणि तरूणींनी आपली माहिती गोपनीय ठेवायाला हवी.

No comments:

Post a Comment