जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका विस्ताराने मोठा असल्यामुळे संख आणि उमदी येथे स्वतंत्र तहसिल कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच जतचा हा पूर्व भाग हा स्वतंत्र तालुका होण्याचा मार्गावर आहे .सध्य स्थितीत प्रत्येक तालुक्याची ठिकाणी लघु आणि मध्यम औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यात आली आहे. त्याच्या अनुषंगाने उमदी येथे सुद्धा एमआयडीसी स्थापना करणे आवश्यक आहे. जत पूर्व भागातील लोकांची मागणी आहे.
उमदी येथे दळणवळणासाठी रस्ते आणि रेल्वेची उत्तम सोय*-सध्या उमदी हे पंढरपूर -विजापूर राष्ट्रीय महामार्गावर आणि जत-सोलापूर राज्य मार्गावर असल्यामुळे येथे दळणवळणाच्या सोयी फार चांगल्या आहेत शिवाय कर्नाटकातील सोलापूर -विजापूर- बेंगलोर दुपदरी विद्युत रेल्वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग सुद्धा २०-२५ किमी अंतरावर इंडी रोड आणि झळकी येथून गेलेला आहे शिवाय सोलापूर एअरपोर्ट पण ७० किमी अंतरावर आहे . मंगळवेढा,पंढरपूर ,विजापूर,इंडी आणि सोलापूर शहरांना जोडणारे उमदी मध्यवर्ती गाव आहे.या दुष्काळी परिसरात एमआयडीसी साठी लागणारी शासनाची आणि खाजगी मालकिची पडीक जमिन सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध होवू शकते. या परिसरात बेरोजगार आणि कुशल आणि अकुशल मंजूराचीही संख्या ही लक्षणिय आहे .सध्या या भागात पाण्याची अडचण असल्यामुळे म्हैसाळ आणि तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी आणण्याचे शर्यतीचे पर्यत चालू आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षात पाण्यांचीही उत्तम सोय होणार आहे हे निश्चित आहे .एकंदरीत या सर्व गोष्टींचा आणि प्रस्तावित क.मंहाकाळ रेल्वे स्टेशन येथिल ड्रायपोर्ट -उमदी- सोलापूर मधील कनेक्टविटी पाहता येथे लघू आणि मध्यम एमआयडीसी चालू केल्यास ड्रायपोर्टला पुरवठा करणारे अनेक कंपन्यांचे गोदामे, उद्योग या एमआयडीसीत येवू शकतात. त्यामुळे या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यासारख्या सदन भाग आणि विकासापासून अतिशय दूर राहिलेल्या या दुष्काळी भागाला येथे एमआयडीसीची स्थापना करून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment