जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने 45व्या तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूलचा आठवीत शिकणारा विद्यार्थी किरण विजय नाईक याने प्रथम क्रमांक मिळविला.
किरण नाईक याने ह्युमन रोबोट (मानवी यंत्र) असे साहित्य बनविले. हे विज्ञान प्रदर्शन बिळूरच्या श्री मुरघाराजेंद्र कन्नड माध्यमिक विद्यालयात भरविण्यात आले. बक्षीस वितरण सभारंभ प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर.डी. शिंदे यांच्याहस्ते किरण नाईक यास देण्यात आले. यावेळी अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव, बिळूर मठाचे मठाधिपती मुरगेंद्र स्वामीजी, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र माने, टी.एल. गवारी, सौ. सुजाता माळी, उमदी शाळेच्या सौ. शिंदे आदी उपस्थित होते. किरण नाईक यास शाळेचे शिक्षक कु. प्रियांका पवार, शाळेचे मुख्याध्यापक काटकर, भीमराव राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले. किरण हा जत येथील गंगा चेरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व व्रुत्तपत्र विजयवाणीचे कार्यकारी संपादक विजय नाईक यांचा चिरंजीव आहे.
No comments:
Post a Comment