सांगली,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्याला साहित्य आणि साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. प्रसिध्द लेखक,कवी आणि 'गीत रामायण' चे रचनाकार गदिमा यांची ही जन्मभूमी आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हटले जाते. बाबाखान दरवेशी, डॉ. सरोजिनी बाबर असे मोठे लेखक,लेखकांचा गोतावळा इथे आहे. आज शेकडो साहित्यिक शारदेची उपासना करताना दिसत आहेत. याशिवाय सांगली जिल्ह्यातील ग्रामीण आजही मोठ्या प्रमाणात छोटी मोठी साहित्य संमेलने भरवली जातात. यातून नवोदितांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे आज शेकडो लेखक लिहिते झाले आहेत. मोठ्या सांगली जिल्ह्याची साहित्य संमेलन परंपरा आहे.
सांगली जिल्ह्याला साहित्य आणि साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. प्रसिध्द लेखक,कवी आणि 'गीत रामायण' चे रचनाकार गदिमा यांची ही जन्मभूमी आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हटले जाते. बाबाखान दरवेशी, डॉ. सरोजिनी बाबर असे मोठे लेखक,लेखकांचा गोतावळा इथे आहे. आज शेकडो साहित्यिक शारदेची उपासना करताना दिसत आहेत. याशिवाय सांगली जिल्ह्यातील ग्रामीण आजही मोठ्या प्रमाणात छोटी मोठी साहित्य संमेलने भरवली जातात. यातून नवोदितांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे आज शेकडो लेखक लिहिते झाले आहेत. मोठ्या प्रमाणात या संमेलनात चर्चा सत्रे,कथाकथन, कविसंमेलन आदी उपक्रम राबविले जातात. अौदुंबरचे सदानंद संमेलन खूप जुने आहे. आज त्याची धुरा पुरषोत्तम जोशी मोठ्या निष्ठेने सांभाळतात. विटा ग्रामीण साहित्य संमेलन रघुराज मेटकरी,रामापूरचे अक्षरयात्री संमेलन स्वाती शिंदे -पवार,पणुंब्रेचे डोंगरी साहित्य संमेलन वसंत पाटील ,देशिंगचे आग्रणी साहित्य संमेलन दयासागर बन्ने आणि मनिषा पाटील, जत तालुक्यातील शेगावचे संमेलन कवी लवकुमार मुळे, मच्छिंद्र ऐनापुरे, श्रीकांत कोकरे, पलूसची दोन संमेलने वासंतीे मेरू यांनि मोठ्या झोकात पार पाडली. किरण शिंदे यांचे रेणावी येथील संमेलन, शहाबाई यादव संमेलन धर्मेंंद्र पवार ,मळणगावचे चारुता सागर संमेलन राजेंद्र भोसले, तासगवचे प्रतिष्ठा साहित्य संलमेलन तानाजी जाधव,कडेगावचे साहित्य संमेलन अंधकवी बाबजी चंद्कांत देशमुखे व सतिश लोखंडे ,इस्लामपूर ज्ञानप्रबोधिनी हे शामराव आण्णा व प्राचार्या दीपा देशपांडे,जागर हे वि.द. कदम दि.बा. पाटील .क्षिरसागर सर ,कालिदास संमेलन हे नंदिनी पाटील.तर कवठेमहांकाळचे आबासाहेब पाटील यांचे साहित्य संमेलन सावंतपूरचे कोजागरी संमेलन, सलगरेचे अरुण निंबाळकर व पारीसा भोकरे यांचे वसंत साहित्य संमेलन ,गुंडेवाडीचे धनंजय सोलणकर यांचे संमेलन अशा भरगच्च साहित्य संमेलनांचा उत्सव सांगली जिल्ह्यात होतो. प्रत्येक संमेलनाला आपले साहित्यीक साहित्य सेवक म्हणून जोडलेले आहेत.ही संमेलने चालवणं आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. शब्दांगणचे नामदेव भोसले ,धनदत्त बोरगावे सर्वजण ग्रामीण संमेलने मोठ्या हिकमतीने राबवताना दिसतात. या संमेलनासाठी देणग्या आणि वर्गणी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय ही शारदीय उपासना पूर्ण होत नाही. शासनाने ग्रामीण भागातील संमेलनांसाठी निधी उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन द्यायला तर हवेच पण पारंपारिक उत्सव साजरा करण्यासाठी मदतीचा हात देण्याची गरज आहे. या संमेलनात चर्चा सत्रे,कथाकथन, कविसंमेलन आदी उपक्रम राबविले जातात. अौदुंबरचे सदानंद संमेलन खूप जुने आहे. आज त्याची धुरा पुरषोत्तम जोशी मोठ्या निष्ठेने सांभाळतात. विटा ग्रामीण साहित्य संमेलन रघुराज मेटकरी,रामापूरचे अक्षरयात्री संमेलन स्वाती शिंदे -पवार,पणुंब्रेचे डोंगरी साहित्य संमेलन वसंत पाटील ,देशिंगचे आग्रणी साहित्य संमेलन दयासागर बन्ने आणि मनिषा पाटील, जत तालुक्यातील शेगावचे संमेलन कवी लवकुमार मुळे, मच्छिंद्र ऐनापुरे, श्रीकांत कोकरे, पलूसची दोन संमेलने वासंतीे मेरू यांनि मोठ्या झोकात पार पाडली. किरण शिंदे यांचे रेणावी येथील संमेलन, शहाबाई यादव संमेलन धर्मेंंद्र पवार ,मळणगावचे चारुता सागर संमेलन राजेंद्र भोसले, तासगवचे प्रतिष्ठा साहित्य संलमेलन तानाजी जाधव,कडेगावचे साहित्य संमेलन अंधकवी बाबजी चंद्कांत देशमुखे व सतिश लोखंडे ,इस्लामपूर ज्ञानप्रबोधिनी हे शामराव आण्णा व प्राचार्या दीपा देशपांडे,जागर हे वि.द. कदम दि.बा. पाटील .क्षिरसागर सर ,कालिदास संमेलन हे नंदिनी पाटील.तर कवठेमहांकाळचे आबासाहेब पाटील यांचे साहित्य संमेलन सावंतपूरचे कोजागरी संमेलन, सलगरेचे अरुण निंबाळकर व पारीसा भोकरे यांचे वसंत साहित्य संमेलन ,गुंडेवाडीचे धनंजय सोलणकर यांचे संमेलन अशा भरगच्च साहित्य संमेलनांचा उत्सव सांगली जिल्ह्यात होतो. प्रत्येक संमेलनाला आपले साहित्यीक साहित्य सेवक म्हणून जोडलेले आहेत.ही संमेलने चालवणं आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. शब्दांगणचे नामदेव भोसले ,धनदत्त बोरगावे सर्वजण ग्रामीण संमेलने मोठ्या हिकमतीने राबवताना दिसतात. या संमेलनासाठी देणग्या आणि वर्गणी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय ही शारदीय उपासना पूर्ण होत नाही. शासनाने ग्रामीण भागातील संमेलनांसाठी निधी उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन द्यायला तर हवेच पण पारंपारिक उत्सव साजरा करण्यासाठी मदतीचा हात देण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment