जत,(प्रतिनिधी)-
अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या 'र्मदानी २' चित्रपटातील हाणामारीचे दृश्य प्रेक्षकांना थिएटरमध्ये लाईव्ह पाहायला मिळाले. पडद्यावर चित्रपट सुरु असताना एक महिला दबंग बनून तिथे पोहोचली. तिने थेट कॉर्नर सीटवर बसलेल्या नवर्याला आणि त्याच्या प्रेयसीला खेचून बाहेर काढले व चोप दिला. अहमदाबादच्या आर्शम रोडवरील मल्टीप्लेक्समध्ये ही घटना घडली.
पतीला आणि त्याच्या प्रेयसीला मारहाण केल्यानंतर तिने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनाही तो पयर्ंत, महिलेने चित्रपटगृहात गोंधळ घातल्याचे समजले होते. नवरंगपुरा पोलिस ठाण्याचे पथक सिनेमागृहात पोहोचले व तिघांना घेऊन पोलिस ठाण्यात आले. या प्रकरणात गुन्हा न नोंदवता पोलिसांनी तिघांना समजावून घरी पाठवले.
नवरंगपूर पोलिस ठाण्याच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला अकाउंटट असून ती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुद्धा चालवते. सोमवारी दुपारी तिला एका मैत्रिणीने फोन करून तुझा नवरा र्मदानी २ चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये आलाय असे सांगितले. त्यात ऐवढे खास काय आहे? असे तिने फोन करणार्याला विचारले. त्यावर मैत्रिणीने 'तुझा नवरा एकटा नाही, त्याच्याबरोबर एक महिला सुद्धा आहे असे सांगितले.' हे ऐकून संतापलेली महिला थिएटरमध्ये पोहोचली.
सुरक्षा रक्षकाने तिला अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला बाजूला करुन ती थेट आतमध्ये घुसली व नवर्याला दुसर्या एका महिलेसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले. तिने आधी नवर्याच्या कानाखाली मारली. सोबत असलेली महिला तिला रोखण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी महिलेने तिला सुद्धा मारहाण केली. प्रेयसीसोबत आलेल्या या माणसाने आधी सलमान खानच्या दबंग ३ ची तिकिट काढण्याचा प्रयत्न केला. पण शो हाऊसफुल्ल असल्यामुळे त्याला तिकिट मिळाले नाही, त्यामुळे त्याने र्मदानी २ ची तिकिट काढली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर महिलेनेही नंतर कुटुंबाचा विचार करुन तक्रार नोंदवण्याचा निर्णय मागे घेतला.
No comments:
Post a Comment