Tuesday, November 12, 2019

बोगस डॉक्टरवर तीन वर्षे कारावासाची शिक्षा


डफळापूर,(प्रतिनिधी)-
बोगस डॉक्टर प्रकरणी जत तालुक्यातील डफळापूर येथील आरोपी प्रणोय ऊर्फ अविक परिमल मलिक यास तीन वर्षे सक्षम कारावास व 10 हजार रुपयांचा दंड व न दिल्यास साध्या कारावासाची शिक्षा जत न्यायालयाने मंगळवारी सुनावली.

जत तालुक्यातील डफळापूर येथे दि.26 मार्च 2013 रोजी दुपारी एक वाजता भरारी पथकाने बोगस रुग्णालयात छापा टाकला होता. महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय कौन्सिलकड़े नोंदणी अगर परवाना नसताना 749.06 रुपये किंमतीचे ॲलोपॅथीक औषधे व व्यवसायासाठी लागणारी साहित्य सामुग्री बाळगून व वापरून त्याची वैद्यकीय व्यवसायासाठी उपयोग करून त्याने परवानगी नसताना स्वतःच्या फायद्याकरिता व अवैद्यरित्या वैद्यकीय व्यवसाय करीत असताना मिळून आला. महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961कलम 33(2) प्रमाणे त्याचे विरुध्द जट पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजीस्टर नंबर 2/2013 अन्वये फिर्यादी वैद्यकीय आधिकारी, सांगली डॉ. दत्तात्रय राजाराम पाटील यांनी दिली होती. त्याचा तपास पो.हे. कॉ. व्ही. एन. पवार (बक्कल नंबर 1632) यांनी करून जत न्यायालयात दोषारोप दाखल केले होते.
फिर्यादी, साक्षीदार, औषध निरीक्षक व तपास आधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. यानुसार सदर आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न व साबित झालेचा युक्तीवाद सरकारी अभीयोक्ता संतोषकुमार पताले यांनी केला. त्यानुसार जत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सौ. सुशीला आर.पाटील यांनी आरोपीस महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम कलम 33(2) अन्वये दोषी धरून आरोपी प्रणोय ऊर्फ अविक परिमल मलिक वय 36 वर्षे रा. डफळापूर ता.जत यास तीन वर्षे सक्षम कारावास व 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभीयोक्ता संतोषकुमार पताळे व जितेंद्र पाटील यांनी काम पाहिले. व त्यांना पो.कॉ.शशिकांत पाटील यांनी सहकार्य केले

No comments:

Post a Comment