जत,(प्रतिनिधी)-
जेलमध्ये घेऊन जाताना 30 नोव्हेंबर रोजी फरार झालेल्या गणेश ऊर्फ पप्पू दत्तात्रय गस्ते (रा. वाढेगाव, ता. सांगोला) या आरोपीस गोपनीय खबर्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास वाळेखिंडी (ता. जत, जि. सांगली) येथे सांगोला पोलिसांनी शिताफीने पकडले, अशी माहिती पो.नि. राजेश गवळी यांनी दिली. गेले 15 दिवस सदर आरोपी सतत जागा बदलत होता.सांगोला तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरून आरोपी गस्ते याने पोलिसाच्या हातास हिसका मारून अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले होते.
आरोपी गस्ते व समाधान आनंदा फाळके (रा. हलदहिवडी, ता. सांगोला) यांनी नॉनबेलेबल वॉरंट रद्द करण्यासाठी पंढरपूरन्यायालयात अर्ज दिला होता. तो अर्ज न्यायालयाने नामंजूर करून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिस हेडकॉन्स्टेबल रवींद्र रामचंद्र बनकर पंढरपूरहून सांगोला येथे आले होते. सांगोला येथे तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन आरोपी गस्ते पळून गेला होता. पोलिस कॉन्स्टेबल बनकर, बाबर यांनी अचानक छापा टाकून वाळेखिंडी येथील घरातून ताब्यात घेऊन गस्ते याला पुन्हा अटक केली आहे.
No comments:
Post a Comment